भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात आज श्रावण मासातील पहिला दिवस आणि पहिला सोमवार निम्मित भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
श्री राजराजेश्वराचे मंदिर पुरातन असून शिवपिंडसुद्धा जुनी खडकात कोरलेली आहे. भक्तांवर दया करणारा आणि संकट समयी भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या राजराजेश्वरावर अकोलेकारांची अपार श्रद्धा आहे.
दरवर्षी शेवटच्या श्रावण सोमवारी राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्यात येतो. हजारो भक्त शहरातून पायी जावून गांधी ग्राम येथून पूर्णा नदीचे जल कावडीने आणतात. या कावड व पालखी यात्रेला देशपातळीवर ख्याती प्राप्त झाली आहे. आज पहिल्या श्रावण सोमवारी जवळ्पास 125 छोट्या मोठया कावड पालखीतून जल आणून भाविकांनी जलाभिषेक केला. यामध्ये युवा भाविकांचा मोठया संख्येने सहभाग होता. मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव देखील दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पहिल्या श्रावण सोमवार निमित्त राजराजेश्वर मंदिरात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली आहे. दुपारी दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र होते. परिसरात विविध गृहपायोगी वस्तू आणि खेळणी विक्रीची छोटी दुकाने विक्रेत्यांनी थाटली असल्याने परिसराला जत्रेचे स्वरुप आले आहे.
भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापन समितीने सुविधा निर्माण केल्या आहेत. तसेच जिल्हा, पोलीस आणि मनपा प्रशासनाने भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी योग्य खबरदारी घेतली आहे. कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांचा चौख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पुर्णा नदी पात्र परीसराची पाहणी
आज रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस स्टेशन दहिहांडा अंतर्गत ग्राम गांधीग्राम येथे भेट दिली. त्यावेळी अनमोल मित्तल सहायक पोलीस अधीक्षक अकोट, आणि पुरूषोत्तम ठाकरे ठाणेदार पो. स्टे. दहिहांडा हे हजर होते. पोलीस अधिक्षक यांनी कावड पालखी उत्सवाचे अनुषंगाने गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पात्राचे परीसराची बंदोबस्ताचे दृष्टीने पाहणी केली. पोलीस अधिक्षक यांनी शिव भक्त व स्थानिक नागरीकांना कावड पालखी उत्सव शातंतेत पार पाडण्या करीता तसेच उत्सवा दरम्यान पोलीसांनी दिलेल्या सुचनाचे अंमलबजावणी करण्याकरीता आवाहन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा