- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा भंडारा येथून सुरू होवून पश्चिम विदर्भातील बुलढाणा येथे समाप्त होणार आहे. दरम्यान आज राज ठाकरे अकोला येथे विधानसभेचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात 11 वाजता येत असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
शहरातील एका मंगल कार्यालयात ते मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी त्यांनी आगामी निवडणुकीत आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर अकोल्यातही उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अकोल्यात ही दुसरी भेट आहे. राज ठाकरे यांच्या विरुद्ध वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीचं तोडफोड प्रकरण महाराष्ट्र भर गाजलं होतं. त्याअनुषंगाने राज ठाकरे यांचा अकोला दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
या दौऱ्याच्या दरम्यान राज ठाकरे हे गाडी तोडफोड प्रकरणात मृत झालेल्या मनसेसैनिक जय मालोकार यांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट देण्याची ही शक्यता वर्तविली जात आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा