political-party-ncp-obc-akola: सर्व पक्षांनी एकत्र येऊन जातीय जनगणनेचा लढा द्यावा - राजा राजापूरकर





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  एकीकडे देशात वाढती महागाई, बेरोजगारी, महिला,दलित अल्पसंख्याक आदी वर्गावर होत असलेले अन्याय, अत्याचार वाढायला लागले असून दुसरीकडे मोदी सरकार यासंदर्भात कोणत्याच उपाययोजना व धोरण राबवीत नसल्याचे दिसून येत आहे. इंडिया आघाडीने घेतलेला जातीनिहाय जनगणनेचा मुद्द्याला भाजप प्रणित केंद्र सरकार विरोध करत असून मोदी सरकारच्या या एककल्ली कारभाराच्या विरोधात जातीनिहाय जनगणणेसाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन तीव्र लढा द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापुरकर यांनी केले. 




स्थानीय शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीनिहाय जनगणना संदर्भातील माहिती दिली. 



ते म्हणाले, देशात सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी हा जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केला.पण आता त्यांच्याच या गंभीर मुद्द्याला बगल दिला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.राष्ट्रवादी नेते शरदचंद्र पवार यांचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संकल्प महाअभियान प्रारंभ करण्यात आले असून यासंदर्भात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भात धरणे आंदोलन राबविण्यात येणार असल्याचे राजापूरकर यांनी यावेळी सांगितले. 



राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख व सचिन वाजे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, न्यायालयाने अनिल देशमुख यांची या प्रकरणातून खोट्या आरोप वरून निर्दोष मुक्तता केली. असे असतानाही भाजपचे एजंट म्हणून काम करीत असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे अनिल देशमुख यांच्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत असल्याचा खुलासा राजापूरकर यांनी यावेळी केला.



जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भात राज्यभरातील ओबीसी समाजाने ही पुढाकार घेऊन हा लढा तीव्र केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 





या पत्रकार परिषदेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, पक्षाचे जिल्हा महासचिव आनंद वानखडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष विष्णू दुधाट, पक्षाचे महानगर अध्यक्ष रफिक सिद्दिकी, प्रदेश प्रवक्ते प्रा डॉ गजानन वाकोडे, प्रदेश उपाध्यक्ष रवी महाले, रवी राठी समवेत बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या