political-news-sanjay-raut-akl: बारामती मधून बहिणीला निवडून देण्याची परंपरा- संजय राऊत यांचा टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांचे स्वागत करताना अकोला जिल्हातील पदाधिकारी (सर्व फोटो BAnews24)





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बारामती मधून बहिणीला निवडून देण्याची परंपरा असून अजित पवार यांच्यावर दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीचा दबाव असल्याचं म्हणत शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी अमित शहा यांना टोला लगावला. 



शिवसेना नेते (उबाठा गट) संजय राऊत यांचे आज सायंकाळी अकोला शहरात आगमन झाले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.





आगामी निवडणुकीत  महायुतीला 170 नव्हे तर 300 जागा मिळणार असल्याचं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेला खोचक टोला लगावला. 



लाडकी बहिण योजेनेसाठी राज्य सरकारकडे पैसे नसून, आगामी एक दोन महिन्यात महायुतीला आणखी काही लाडके आठवतील असेही संजय राऊत म्हणाले. तर परत दिल्लीच्या तोंडाला फेस आणणारे उद्धव ठाकरे यांची पुन्हा राउतांनी स्तुती केली. 







संजय राऊत हे विभागीय आढावा बैठक साठी अकोला जिल्हयात आले असून, उद्या बैठक घेणार आहे. आज आगमन प्रसंगी अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी संजय राऊत यांचे स्वागत केले.




टिप्पण्या