political-news-bjp-on-upa-akl: सत्ता न मिळाल्यामुळे युपीए घटकाचा देशामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न -भाजप नेते प्रल्हाद सिंह पटेल यांचे वक्तव्य

भाजप नेते प्रल्हाद सिंह पटेल आणि खासदार अनुप धोत्रे  संवाद साधताना 





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सत्ता न मिळाल्यामुळे युपीए घटक देशामध्ये अराजकता निर्माण करुन समाजामध्ये जातीमध्ये भांडण लावून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या प्रक्रियेला थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.  विदेशी ताकदाच्या बळावर हे कार्य सुरू असून, सनातन प्रेमी व देशप्रेमी नागरिकांनी यापासून सजग राहून देशावर प्रेम करणाऱ्या सर्व या देशातील सर्व घटकांनी समर्थपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे  प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व मध्यप्रदेश कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केले. 





खासदार संजय धोत्रे यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध व पक्ष संघटनेच्या दृष्टीने अकोला बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संवाद साधताना ते बोलत होते. 




खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी जाऊन माजी खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 




यावेळी खासदार अनुप धोत्रे सौभाग्यवती सुहासिनी धोत्रे, समीक्षा  धोत्रे, मंजुषा सावरकर, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, किशोर पाटील, श्याम बडे जयंत मसने, विजय अग्रवाल, गिरीश जोशी, माधव मानकर, अक्षय जोशी, संजय गोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड, चंदा शर्मा, वैशाली निकम, उमेश पवार, मनीराम टाले, धनंजय ढबाले, श्रीकृष्ण मोरखडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या