political-news-akola-congress: भाजप सरकार महिलांच्या सुरक्षितते संदर्भात असंवेदनशील; नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी - काँग्रेस प्रवक्ता डॉ. पुजा त्रिपाठी यांचे विधान





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असून देशात महिलांवरील अत्याचार व हत्या मध्ये प्रचंड वाढ होत असताना केंद्र व राज्यातील भाजप सरकार महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात असंवेदनशील व निगरगट्ट असून शासनाच्या अशा नाकर्तेपणामुळेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस प्रवक्त्या डॉ. पूजा त्रिपाठी यांनी केला. 



स्वराज्य भवन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. त्रिपाठी यांनी देशात सर्वदूर वाढत असणाऱ्या महिला, मुलीवरील सामूहिक बलात्कार व अत्याचार संदर्भात आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 





त्या म्हणाल्या, देशातील महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी अमलात असलेला निर्भया फंड हा 75 टक्के तसाच पडून असून बेटी बचाव, बेटी पढाव हा फंड पण अडगळीत पडून आहे. महिला मुलींच्या बलात्कार हत्या प्रकरणात केवळ थातूरमातूर चौकशी करून भाजप सरकार अशा संवेदनशील प्रकारणाला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रात वाढत चाललेल्या या अत्याचाराच्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



एकनाथ शिंदे शासनाच्या कार्यकाळात  आतापर्यंत राज्यात तब्बल 21 बलात्काराच्या घटना झाल्याचा आरोप  डॉ त्रिपाठी यांनी यावेळी केला. बदलापूर येथील घटना हे राज्यासाठी कलंकाची बाब असल्याचा निर्वाळा डॉक्टर त्रिपाठी यांनी यावेळी केला. राज्यात बदलापूर, वाडेगाव बाळापुर  आदी ठिकाणी झालेला महिला वरील अत्याचार प्रकरणाचा शासनाने योग्य  दखल घेवून अशा प्रकरणांचा तात्काळ सक्षमक्ष करावा. यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी राज्यभर बंद घोषित करण्यात आला असून याला यामध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मातृ शक्तींच्या प्रती आपली संवेदना प्रकट करावी असे आवाहन डॉ त्रिपाठी यांनी यावेळी केले. 





यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अशोक अमानकर व महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखेडे यांनी या अकोल्यातील बंदची रूपरेखा मांडली. सर्किट हाऊस येथून सकाळी 9 वाजता महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे अकोला महानगर बंद करण्याबाबत गांधी रोड पासून संपूर्ण शहरभर फिरून नागरिकांना बंदचे आवाहन करणार असल्याचे यावेळी सांगितले.याला सर्व संस्था संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 




यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे, डॉ अभय पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी डॉ. संजीवनी बिहाडे, विभा राऊत,महिला जिल्हाध्यक्ष पूजा काळे, महानगर अध्यक्ष पुष्पा देशमुख, आशा चंदन, संगीता आत्राम, सोनाक्षी मोरे, प्रगती देशमुख ,अरुणा लबडे, तश्वर पटेल , प्रशांत प्रधान, रहमान बाबू आदी उपस्थित होते.

टिप्पण्या