political-akl-mva-silent-protest: तोंडावर काळ्या फिती बांधून आणि हाती काळे झेंडे घेवून महाविकास आघाडीने नोंदविला मुक निषेध




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: देशात आणि राज्यात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार आणि अल्पवयीन मुलींचा होणारा लैंगिक छळ विरुद्ध महाविकास आघाडीने आज बंद पुकारला होता. मात्र हा बंद मागे घेण्यात आला. आज अकोल्यात महाविकास आघाडी तर्फे बदलापूर व अकोला जिल्ह्यातील काझीखेड येथील सहा लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात काळ्या फिती तोंडाला बांधुन आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन करण्यात आले. शहरातील नवीन बस स्टँड समोर हा आंदोलन पुकारण्यात आले होते.



बदलापूरात शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर 'महाराष्ट्र बंद' काल मागे घेण्यात आला होता.



मात्र, आज राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी घेतल्याने अकोल्यातही अनुषंगाने भारतीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाकडून नवीन बसस्थानक चौक जवळ आंदोलन करण्यात आले. 



यावेळी आंदोलनकर्त्यानी सरकार विरोधात एकही शब्द न उच्चारता मुक  निदर्शने दिली. या आंदोलन दरम्यान मुसळधार पावसानेही हजेरी लावली. आंदोलकांनी पावसात भिजत चौकात ठिय्या दिला.



देशातील, राज्यातील चिमुरड्या मुली आणि महिलांना न्याय द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आंदोलकांनी केली.




डोक्याला व तोंडावर काळ्या फिती बांधून आणि हाती काळे झेंडे घेवून महाविकास आघाडीचे स्थानिक नेते, माजी महापौर, आमदार, खासदार, नेते व कार्यकर्ते हे आंदोलनात सहभागी झाले होते. 




यामध्ये प्रामुख्याने आमदार नितिन देशमुख, प्रकाश ढवळे, संग्राम गावंडे, माजी महापौर मदन भरगड, गोतमारे डॉक्टर प्रकाश वानखडे, गजानन बोराळे, पुष्पा देशमुख, कपिल रावदेव, अतुल पवनीकर, अशोक आमानकर, माजी उपमहापौर रफिक सिद्दिकी आदी सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





टिप्पण्या