national-space-day-vidarbha: राष्ट्रीय अवकाश दिन: विदर्भस्तरीय अंतराळ प्रदर्शन आणि मॉडेल स्पर्धा

 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : पहिल्या राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त अकोल्यात आज विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ तर्फे विदर्भस्तरीय अंतराळ प्रदर्शन आणि मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.



भारत देशाने अंतराळात सोडलेल्या यशस्वी उपग्रहाचे या चिमुकल्या वैज्ञानिकांनी प्रतीकृती तयार केल्या होत्या. ही स्पर्धा विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून 3 मॉडेल्स निवडण्यात आले होते.




विदर्भस्तरीय या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 874  विद्यार्थ्यांनी 437 मॉडेल्सची नोंदणी केली होती. यातून निवडलेल्या उत्कृष्ट 33 मॉडेल्सची आज अकोल्यात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.




या प्रदर्शनात विद्यार्थ्यांचे मॉडेल्स पाहण्यासाठी शाळा, महाविद्यालये व  विज्ञानप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. विदर्भस्तरीय या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, पारितोषिक म्हणून पाच विद्यार्थ्यांना इसरो पाहण्याची संधी आणि निःशुल्क प्रवास देण्यात आला. 




विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानप्रती आवड निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.



टिप्पण्या