- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
mitkari-car-vandalism-case-akl: कर्णबाळा दूनबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल; तीन आरोपींना एक दिवसाचा पीसीआर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्न आणि गाडीची तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी कर्णबाळा दूनबळे सह 21 जणांवर अकोला सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या 21 आरोपींपैकी मुख्य आरोपी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दूनबळे यांनी अटक पूर्व जामीन करिता अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून, या अर्जावर 7ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
आता पर्यंत या प्रकरणात अकोला पोलिसांनी एकूण 12 मनसैनिकांना अटक केली.
आज या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 3 मनसैनिकांना 1 दिवसाची पोलीस कोठडी अकोला न्यायालयाने सुनावली आहे.
दरम्यान, काल अटक करण्यात आलेल्या 6 मनसैनिकांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला.
याप्रकरणी आता पर्यंत अटक करण्यात आलेल्या 9 मनसैनिकांना जामीन मिळाला आहे. तर फरार 8 आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.
या आरोपींना मिळाला जामीन
आता पर्यंत पंकज साबळे, सौरभ भगत, दीपक बोडखे, ललित यावलकर,अरविंद शुक्ला, मुकेश डोंगफळे,सचिन गालट, शिवप्रताप निराळे, रुपेश तायडे यांना जामीन मिळाला आहे.
यांना एक दिवसाची पोलीस कोठडी
सचिन गव्हाळे, राजेश काळे, निसार शेख यांना एक दिवसांची पोलीस कोठडी न्यायलयाने सुनावली आहे.
हे आरोपी अद्याप फरार
या प्रकरणात मुख्य आरोपी कर्णबाळा दूनबळे, राकेश शर्मा, प्रशंसा अंबेरे, सतीश फळे, भूषण भिरड, मंगेश देशमुख हे आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यास पोलीस पथक रवाना झाली आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा