ladki-bahin-yojana-rakhi-festiv: बहिणी एक लाख राख्या घेवुन भेटीला रवाना; शिवसेना संपर्कनेते गोपीकिशन बाजोरीया यांनी दाखविली हिरवी झेंडी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र बहिणींना प्रत्येकी 3 हजार या प्रमाणे निधी वितरीत करण्यात आला. यामुळे बहिणींनी आनंद व्यक्त करीत आपल्या लाडक्या भावासाठी म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी स्वतः बनविलेल्या एक लाख राख्या घेवून शनिवारी त्या मुंबईसाठी रवाना झाल्या. यावेळी शिवसेना संपर्कनेते गोपीकिशन बाजोरीया यांनी लाडक्या बहिणींची आस्थेने विचारपुस करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमेश भुसारी यांची उपस्थिती होती. 



जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत उमेद अभियान राबविण्यात येते. या अभियानामध्ये जिल्हातील हजारो महिला जोडलेल्या असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बहिणीला 3 हजार रूपये वितरीत केले. यामुळे उमेदच्या महिलांना अत्यानंद झाला असुन बचत गटातील महिलांनी स्वनिर्मित एक लक्ष राख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करीता घेवून त्यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाल्या. 


या अभियानातील प्रत्येक तालुक्यातील दोन प्रतिनिधी या प्रमाणे 14 बहिणी रवाना झाल्या. त्यामध्ये संगिता रामेकर, शिला ठोपकर, नम्रता बंड, बबीता वाकोडे, शारदा मोरवाल, शितल वाघ, पदमा चिकटे, अनुराधा डांगे, माहिदा बिशेख, रेखा तुपवाडे, दिपाली चौधरी, दिपाली सोळंके, अंजली लाड, तेजस्विनी आवटे, शितल वाकोडे यांचा समावेश आहे. या पैकी एका बहिणीला प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्याची संधी मिळणार आहे. महिलांसोबत उमेद अभियांचे समन्वय म्हणून अर्चना डाबेराव, अमोल बांबर्डे, संजय बोधडे हे जात असून प्रवासा दरम्यान महिलांसोबत प्रथामोपचार किट्स सुध्दा दिले आहेत. 


बाजोरीया यांनीही बांधल्या राख्या


  

उमेद अभियानातील बचत गटांच्या महिलांची तयार केलेला एक लाख राख्या प्रत्येक तालुक्यातील दोन या प्रमाणे 14 महिला मुंबईला घेवुन निघाल्या. तत्पूर्वी, त्यांना मुंबईसाठी लागणारी वाहन तसेच ईतरही सुविधा गोपीकिशन बाजोरीया यांनी उपलब्ध करून दिल्या. तसेच या बहिणींची विचारपुस करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उमेदच्या महिलांनी शिवसेना संपर्क नेते बाजोरीया यांना सुध्दा राख्या बांधुन आर्शिवाद घेतले यावेळी बाजोरीया यांनी वाहन चालकांना विशेष सुचना देत खबरदारीने प्रवास करण्याचे निर्देश दिले.

टिप्पण्या