- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: काझीखेड येथील सहा शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवार 20 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. उरळ पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला आज 21 ऑगस्ट रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तात विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने आरोपीला सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. अकोला सत्र न्यायालयाने आरोपी शिक्षक प्रमोद सरदारला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक 20 ऑगस्ट रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन उरळ, यांना बाल कल्याण समीती सदस्य प्रांजली मनोज जयस्वाल यांनी फोनव्दारे माहीती दिली की, जिल्हा परीषद उच्च माध्यमिक शाळा, काझीखेड येथील शिक्षक आरोपी प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलींचा विनयभंग केला.
या माहीतीवरून पोलिसांनी घटनास्थळी जावून शिक्षक आरोपी प्रमोद सरदार यास तात्काळ ताब्यात घेतले. पिडीत फिर्यादीने दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशनला अपराध नं. 292/24 कलम 74, 75 बि.एन.एस. सह कलम 8, 12 लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निता दामधर या करीत आहे, अशी माहिती गोपाल ढोले सहायक पोलीस निरीक्षक, ठाणेदार पोलीस स्टेशन उरळ यांनी दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा