- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
kazikhed-case-akola-balapur: काझीखेड प्रकरणाबाबत मराठा पाटील संघटनेचे निवेदन; आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, संदीप पाटील यांची मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: काझीखेड (ता. बाळापूर) मधील जिल्हा परीषद शाळेतील सहा मुलींवर त्याच शाळेतील शिक्षकाकडून झालेल्या अत्याचार प्रकरणाबाबत संपुर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविधि सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच गावकरी आणि पालकांकडून तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहेत. मराठा पाटील समाज संघटनेतर्फे सुध्दा संदीप पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मराठा समाज संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात हे प्रकरण द्रुतगती न्यायालयामध्ये चालवून सरकारी विधीज्ञांची निवड करणे आणि खटला तितक्याच सक्षमतेने हाताळणे आवश्यक आहे, असे नमूद करत जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत संबंधित पोलीस यंत्रणेला योग्य ते निर्देश देण्यात यावेत असे म्हटले आहे.
या प्रकरणी आवश्यक ते दस्ताऐवज आणि फौजदारी प्रक्रियेच्या अनुषंगाने असलेले सर्व दस्ताऐवज न्यायालयामध्ये तातडीने सादर करण्यात यावेत,
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोपी विरूध्द चौकशी अधिकारी नियुक्ती करून अहवाल शासन निर्णयानुसार सहा महिन्याचे आत खाते चौकशी पुर्ण करण्यात यावी व संबंधित खाते चौकशी मध्ये चौकशी अधिकारी व सादर कर्ता म्हणून महिला अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी संदीप पाटील यांनी केली आहे.
यावेळी दीपक पोहरे, विठ्ठल नळकांडे, वसंतराव पोहरे, मोहनराव सरप, देविदास वाघ, रवींद्र पोहरे, सागर सरप यांच्यासह मराठा पाटील संघटनेचे असंख्य सदस्य उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा