- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
kawad-palkhi-festival-akola: कावड पालखी मिरवणुक मार्गाची प्रशासनाने केली संयुक्त पाहणी; राजराजेश्वर मंदीर परीसर ते गांधीग्राम पर्यत चोख बंदोबस्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार 2 सप्टेंबर रोजी येत असुन अकोला शहर व जिल्हा परिसरात पारंपारीक कावड पालखी मिरवणुक व पोळा उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस दल अकोला यांनी उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले असुन सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना अमलात आणण्यात येत आहेत. शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जिल्हाधिकारी अजीत कुंभार, म.न.पा. आयुक्त सुनिल लहाने तसेच कावड पालखी मिरवणुकीचे संयोजक यांच्या समवेत अकोला शहरातील पालखी मिरवणुक मार्गाची संयुक्त पाहणी केली.
नागरिकांनी कावड पालखी मिरवणुकीत तसेच शहरातील विविध मार्गावर कावड धारकांचे स्वागत करताना प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे वाहतुक नियमांचे पालन करावे, विशेष करून ज्या ठिकाणी वाहतुक वळविली जाणार आहेत व जे मार्ग वाहतुकीसाठी खुले आहेत त्याच मार्गाने वाहनांचे मार्गक्रमण करावे. तसेच महिलांनी पालखी स्वागतासाठी गर्दीत सामील होतांना मौल्यवान दागिने, वस्तु यांची काळजी घ्यावी, तसेच आपली लहान मुले गर्दीत हरवणार नाहीत याकडे विशेष लक्ष दयावे. यासंदर्भात नागरीकांना काही अडचणी असल्यास त्यांनी बंदोबस्तावर तैनात पोलीसांशी संर्पक करावा किंवा डायल 112 या क्रमांकावर कॉल करावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अकोला जिल्हयात प्रथम श्रावण सोमवार ते चौथा श्रावण सोमवार या चारही श्रावण सोमवार निमीत्त आयोजीत कार्यक्रमांना नागरीकांकडुन पोलीस प्रशासनाचे बंदोबस्त नियोजनास उत्तम प्रतिसाद व सहकार्य मिळाले आहे. पाचव्या श्रावण सोमवार निमीत्त आयोजीत कावड पालखी मिरवणुक उत्सव साजरा करतांना इतरांच्या भावना दुखावणार नाहीत तसेच सर्वधर्मसमभाव व सामाजीक ऐक्य अबाधीत राहील याची जाणीव ठेवुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाव्दारे केले आहे.
पोलिसांची करडी नजर
पोलीस दलातर्फे अकोला शहर कावड पालखी पारंपारीक मार्गावर चोख बदोंबस्ताचे नियोजन करण्यात आले असुन, या पार्श्वभुमीवर राजराजेश्वर मंदीर परीसर ते गांधीग्राम पर्यत सेक्टर पेट्रोलिंग करीता पोलीस मनुष्यबळ व वाहने तैनात करण्यात आलेली आहेत. मिरवणुक मार्गावरील सर्व आवश्यक त्या ठिकाणी वाहतुक नियंत्रण व नियमन या करीता वाहतुक पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. महत्वाचे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराज, बॅरीगेटस, टॉवर लावण्यात आले असुन घातपात विरोधी पथका तर्फे तपासणी करण्यात येत आहे, त्याव्दारे पोलीसांची प्रत्येक घडामोडीवर नजर असणार आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
कावड बंदोबस्त करीता शहरात 01 अपर पोलीस अधीक्षक, 04 उपविभागीय पोलीस अधिकारी, 14 पोलीस निरीक्षक, 36 सपोनि/पोउपनि तसेच 749 पोलीस अंमलदार व 800 होमगार्ड, 4 जलद प्रतिसाद पथक, 8 स्ट्रायकींग फोर्स यासह राज्य राखीव पोलीस बल 01 कंपनी तैनात करण्यात आलेले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा