katepurna-dagdaparwa-dams: काटेपूर्णा व दगडपारवा धरणाचे दारे उघडली; प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: दमदार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील जल साठे ओसंडून वाहत आहेत. यामधील काटेपूर्णा (महान) व दगडपारवा धरणाचे दरवाजे उघडून  पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 




या दोन्ही प्रकल्प अंतर्गत  येत असलेल्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवस संततधार पाऊस राहिल्यास सर्व प्रकल्पात 100 टक्के जलसाठा निर्माण होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.



काटेपूर्णा प्रकल्पात 82.31 टक्के जलसाठा निर्माण झाला असून गेल्या 24 तासापासून या प्रकल्पाचे चार वक्र द्वार प्रत्येकी 30 सेंटिमीटरने उघडून 92. 23 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 



दगडपरवा प्रकल्पात 88.42 टक्के जलसाठा निर्माण झाला असून, या प्रकल्पाचे चार वक्रद्वार पाच सेंटिमीटर ने उघडून या मधून 16.40 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 



धरणांची स्थिती 




काटेपूर्णा प्रकल्प 


पातळी 346.74 मी 

साठा 71.075mm3 

टक्केवारी 82.31%

आजचा पाऊस  13 mm

एकूण पाऊस     438 mm

गेट  04  open.     30 सेमी.

discharge   92.23 cumecs 



वान प्रकल्प 

ता,तेल्हारा

पातळी 398.97मी

साठा.   35.30mm3

टक्केवारी 43.07%

आजचा पाऊस    07mm

एकूण पाऊस      425 mm

 गेट  00          



मोर्णा प्रकल्प 

ता पातूर

पातळी  365.85मी

साठा      32.57 mm3

टक्केवारी 78.55 %

आजचा पाऊस    17 mm

एकूण पाऊस 617 mm

सांडवा.  00 सेमी,

00 cumecs.



निर्गुणा प्रकल्प 

ता पातूर

पातळी     390.30     मी

साठा        24.19    mm3

टक्केवारी  83.85 %

आजचा पाऊस   00  mm

एकूण पाऊस    138    mm

सांडवा  00     सेमी

0.00  cumecs




उमा प्रकल्प 

ता, मूर्तीजापुर

पातळी       340.90    मी

साठा         4.887     mm3

टक्केवारी. 41.81  %

आजचा पाऊस  00  mm

एकूण पाऊस    210  mm

सांडवा 00सेमी

0.00 cumecs,



दगडपारवा प्रकल्प

पातळी      316.90   मी. 

साठा         09.01     mm3

टक्केवारी    88.42 %

आजचा पाऊस 07 mm

एकूण पाऊस      380 mm

गेट   04 open.  5 सेमी.

discharge   16.40 cumecs.



 


Latest update 

दगडपारवा प्रकल्प


विद्रूपा नदीपात्रात सोडण्यात येत असलेला विसर्ग 16.40 घ.मी./से वरून कमी करून 8.20 घ.मी./से एवढा करण्यात आला आहे. .पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे        


दगडपारवा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष Dagad parva 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭                                                  


जलाशय पातळी - 316.75 मीटर 

 उपयुक्त साठा - 8.45 द.ल.घ.मी. 

 टक्केवारी -  82.92% 

 आजचा पाऊस - 00 मीमी  

 एकूण पाऊस - 380 मीमी

 2 गेट प्रत्येकी 5 से.मी. सुरू आहेत 

 विसर्ग -- 8.20 घ.मी./से


टिप्पण्या