journalist-rajendra-shrivas-akl: पत्रकार राजेंद्र श्रीवास काळाच्या पडद्याआड





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: दैनिक राज दर्पणचे संपादक ज्येष्ठ पत्रकार स्व. राम किशोर श्रीवास गुरुजी यांचे पुत्र पत्रकार तथा अँकर राजेंद्र श्रीवास यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.



हिंदी भाषिक पत्रकार, आर. आर. सी. नेट वर्क (सिटी चॅनल) माजी संपादक, सुफा न्यूज चैनल न्यूज एडिटर, बेस्ट एंकर म्हणुन राजेंद्र श्रीवास यांनी आपली कारकीर्द गाजविली. अल्प आजाराने आज 7 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. 



त्यांच्या पश्चात पत्नी हिंदी साहित्यिक प्रा. कोमल श्रीवास, एक मुलगी ,एक मुलगा व मोठा आप्त परिवार आहे. पत्रकार राजेंद्र श्रीवास यांच्या निधनाने अकोला जिल्हा पत्रकार संघाने शोक व्यक्त करीत श्रद्धांजलि अर्पण केली. 



भारतीय अलंकार न्यूज 24 परिवार तर्फे श्री राजेन्द्र श्रीवास यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पण्या