- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
crime-teacher-misdemeanor: शिक्षकाने केले सहा विद्यार्थिनीं सोबत गैरकृत्य; विकृत शिक्षकाला अटक, अकोल्यात संतापजनक प्रकार उघडकीस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने शाळेतील सहा मुलीं सोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार आता उघडकीस आला आहे.
आज संध्याकाळी याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार (वय 48) विरुद्ध बी एन एस व पॉक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हा शिक्षक वर्ग 8 वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. हा शिक्षक गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. त्याच प्रमाणे त्यांच्याशी अश्लील गप्पा ही मारायचा. अखेर आज पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आले आहे.
पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. तर सहा मुलींचे बयान सुद्धा घेण्यात आले आहेत. या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या संताप जनक घटनेचे माहिती मिळताच उरळ पोलिसांनी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता तात्काळ आरोपी शिक्षकाला अटक केली हे विशेष.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा