- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
bjp-akola-political-party-news: भाजपाने आंदोलनाचे उत्तर दिले आंदोलनाने ; 'जाणिवांचा जागर ' करीत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी घेतली शपथ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आंदोलनाचं उत्तर आंदोलनाने अकोल्यात ही पाहायला मिळालं , महाविकास आघाडी तर्फे करण्यात आलेल्या विविध आंदोलनाचा उत्तर अकोल्यात भाजपने 'जाणिवांचा जागर ' च्या माध्यमातून दिला.
अकोल्यातील धिंग्रा चौकात महाविकास आघाडी तर्फे काळ्या फित लावून , काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आलं तर याच चौकात भाजपने सुद्धा कोलकाता, बदलापूरसह अनेक ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराबद्दल समाजाच्या संवेदनांना आवाहन करत अशा घटनांतील पिडीत , त्यांचे कुटुंबीय यांच्यासोबत समाज ठामपणे उभा असल्याची जाणीव करून दिली. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत या घटनांना आळा घालण्यासाठी शपथ सुद्धा घेतली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या उपस्थितीत हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं.
*भाजपा तर्फे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी.
*महात्मा गांधी, मदनलाल धिंग्रा यांच्या स्मारकाला अभिवादन.
*खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह महिला आघाडी युवाशक्ती मोठ्या संख्येने सामील.
महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण हेच भाजपचे ध्येय - आमदार सावरकर
कोलकाता,बदलापूर व अकोला जिल्ह्यात व इतर ठिकाणी जे घडले ते वाईट होते, आम्ही समाज म्हणून माणूस म्हणून घडलेल्या घटनेचा निषेध करतो. समाजात अशा घटना घडू नयेत, आपल्या महिला भगिनी सुरक्षित रहाव्यात म्हणून आम्ही हा जाणीव जागर करतो. हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता, होऊच शकत नाही. महिलेला न्याय मिळाला पाहिजे हीच भाजपची भूमिका आहे, म्हणून लाडकी बहीण, बसच्या तिकीटमध्ये सवलत, लखपती दीदी, लेक लाडकी अशा अनेक योजना महायुती सरकार आणते आहे. महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण हेच भाजपचे ध्येय आहे. असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
स्थानिक गांधी जवाहर पार्क समोर हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौक इथे जाणीव, जागर समाज प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर पाटील हे होते.
महाविकास आघाडी केवळ सरकारला बदनाम करणे हा उद्देश घेऊन कार्यरत आहे. परंतु देशांमध्ये अनेक घटना होत असताना त्याविषयी एकही उच्चार काढत नाही. यावरून त्यांची भूमिका लक्षात येते आणि काही लोक राज्य सोडून इतर राज्यातून नामदार शिंदे सोबत जाऊन परत आलेले यांना अनेक साक्षात्कार होत असून केवळ भाजप द्वेष हे एकमेव लक्ष घेऊन राजकारण करणारे तत्व यांची प्रवृत्ती जिल्ह्यातील लोकांना माहीत असल्याची ही किशोर पाटील यांनी सांगून भाजपवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे,असे आव्हान केले.
उद्धवजी ठाकरे त्यांच्या काळामध्ये कोविडमध्ये हॉस्पिटलमध्ये झालेल्या घटना हे विसरले असतील. त्याबद्दल संवेदना व्यक्त करण्यास व राजकारण करणारना ईश्वर सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना खासदार अनुप धोत्रे केली.
एडवोकेट देवाशिष काकड यांनी यावेळी शपथ वचन केले. भारत माताला आणि भारतीय संविधानाला घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करून भाजपा कार्यकर्त्यांनी शपथ घेतली की, स्त्री पुरुष समानतेच्या तत्त्वाचा यापुढे व सातत्याने निष्ठेने पालन करील माजी कुटुंब माझा सामाजिक परिवार माझ्या समाजामध्ये जाणीव जागृतीसाठी मी अखंडपणे प्रयत्न करेल. माझ्या प्रयत्नाचा भाग म्हणून मी स्वतः मध्ये बदलापासून सुरुवात करेल समाजातील प्रत्येक ज्येष्ठ कनिष्ठ आणि स्त्रीचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर हे देखील माझे कर्तव्य राहील. माझ्या कुटुंबातील वयाने ज्येष्ठ कनिष्ठ यांचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर ही माझी जबाबदारी असेल व त्यांचे आदर हे माझे कर्तव्य राहील त्यांचे शिक्षण त्यांचे कल्याण त्यांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेल स्त्रियांचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर न जपणाऱ्या प्रवृत्तीचा विरोध करीत आलो आहे. यापुढे देखील अशा प्रवृत्ती विरुद्ध हे माझे जीवनाचे ध्येय राहील. राजे छत्रपती शिवरायांचा आदर्श मी माझ्यासमोर आणि माझ्या कुटुंबासमोर अखंडपणे ठेवेल अशी शपथ मी आज घेतो. अशी शपथ घेण्यात आली.
बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न - सुमनताई गावंडे
बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सोबत सुमनताई गावंडे यांनी केला.
बदलापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होणार, महायुती सरकार त्या दिशेने प्रयत्नशील आहे अशी ग्वाही सुमंत गावंडे यांनी दिली. यावेळी गावंडे यांनी अनेक दाखले देऊन मविआ नेत्यांच्या बदलापूर प्रकरणातील दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले.
माणुसकीला लाजवेल अशा बदलापूरच्या प्रकरणात विरोधकांकडून महायुती सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेचा समाचार गावंडे यांनी घेतला.
त्या म्हणाल्या की, या प्रकरणी तात्काळ एसआयटी नेमली, अकार्यक्षम पोलिसांना बडतर्फ केले, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक केली, सर्वपक्षीय मंडळी विश्वस्त मंडळावर असलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरु केली, नराधमाला अटक केली. महायुती सरकारने शक्य ते सर्व तातडीने केले. याप्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबत पोलिसांकडून दिरंगाई घडल्याची टीका केली जाते आहे. मात्र लहान मुलगी पोलीस ठाण्यात आल्यानंतर लगेच वैद्यकीय तपासणीला पाठवले, तपासणीला किमान 3-4 तास लागतात. त्यानंतर तिच्याकडून पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून घेतला. लहानग्या मुलीला अजून शरीराची ओळख नाही, तिच्यासोबत नक्की काय घडलं हे तिच्याकडून जाणून घेण्यासाठी वेळ लागला, असा खुलासा पोलिसांकडून केला गेला आहे. असे असताना विरोधकांकडून या दुर्दैवी प्रकरणी राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले जात आहे, असा आरोप गावंडे यांनी केला.
मविआ नेत्यांच्या अलीकडच्या काळातील काही वक्तव्यांचा विचार करता बदलापूरच्या दुर्दैवी घटने नंतरचे आंदोलन, रेल रोको हे सगळे मुद्दाम ठरवून होते आहे, का याचा विचार सूज्ञ जनतेने करायला हवा असे गावंडे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी चे नेते महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो असे वक्तव्य केले. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे नाना पटोले , प्रणीती शिंदे, आमदार देशमुख हे आंदोलनाची धग अधिक पेटवण्याच्या प्रयत्नात दिसले. आंदोलनकर्त्यांच्या हातात, 'लाडकी बहीण योजना रद्द करा', असे फलक का होते? संवेदनशील प्रसंगावेळी या लोकांच्या हातात असे बॅनर्स का होते असा सवाल करत बदलापूर घटनेच्या आडून लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा मविआच्या नेत्यांचा कट आहे असा घणाघात गावंडे यांनी केला.
श्रीमती गावंडे यांनी सांगितले की, सरकारी वकील म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांना कपिल सिब्बल चालतात पण उज्वल निकम चालत नाहीत . खैरलांजी, कोपर्डी, कोल्हापूर बालहत्याकांड, शक्ती मिल सारख्या अनेक दुर्दैवी घटनांमध्ये पीडित महिलांच्या बाजूने लढत नराधमांना कठोरात कठोर शिक्षा ज्यांनी दिली, ज्यांनी आत्तापर्यंत एकाही गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतले नाही ते उज्वल निकम आता या मंडळींना अचानक नकोसे झाले. मविआ सरकारच्या कार्यकाळात माताभगिनींच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकाची वाहने सुप्रिया सुळे त्यांच्या स्वत: च्या सुरक्षा ताफ्यात वापरत होत्या याचे त्यांना सोईस्कर विस्मरण झाले आहे.
माजी खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष जयंत मसने,विजय अग्रवाल,सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, सिद्धार्थ शर्मा, देवाशिष काकड, संतोष पांडे, दिलीप मिश्रा, संदीप गावंडे, रमेश कारीहार, पवन पाडीया, राजेंद्र गिरी, सागर शेगोकार, प्रशांत अवचार, डॉक्टर योगेश शाहू, अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले, हरीश काळे, संतोष डोंगरे, चंदा शर्मा, सुमन गावंडे, अश्विनी हातवळणे, रश्मी कायंदे, चंदा ठाकुर , छाया तोडसाम, दीपिका ठाकुर, वैशाली निकम, निशा कढी, राधा तिवारी, मोनिका गावंडे, पवन महल्ले, संजय झडोकार, दिलीप नायसे, अमोल गिते, वैकुंठ ढोरे, चंदु महाजन, मनोज साहू नितेश पाली, देवेंद्र तिवारी, कृष्णा पांडे, राहुल चौरसिया, राजेश वगारे, प्रवीण झापडे, राजू नेरकर, सुगत गवई, रमेश खोबरे, भूषण इंदोरीया, गणेश सपकाळ, हेमंत शर्मा, दिलीप भरणे, पुरुषोत्तम पानझडे, रवी यादव, विठ्ठल देशमुख, उज्वल बामनेट, कुलदीप दुबे, जितू देशमुख, बल्लू चौधरी, नवीन जाधव, लाला जोगी, विक्की ठाकुर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा