- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-crime-theft-jewelers-ak: अकोल्यातील दोन सराफा दुकानात चोरी; महिला आरोपी अटकेत, गुन्ह्यांची कबुली, 61 हजाराचा मुद्देमाल जप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील दोन सराफा दुकानातुन हात चालाखीने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा अकोलाने अटक केली आहे. या आरोपी कडून पोलिसांनी 61 हजाराचा मुददेमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 09 ऑगस्ट 2024 रोजी पो.स्टे. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील धर्मचक्र ज्वेलर्स या दुकानामधुन ग्राहक बनून एक बुरखाधारी अनोळखी महिला आली. सोन्याचे दागिने पाहत या महिलेने हात चालाखी करून दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेले. दुकानदाराच्या चोरीची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला अप. क्र. 254/2024 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचे तपासात गुन्हयाची उकल करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन सि.सि.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली. फुटेज मध्ये एक बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने चोरी करतांना दिसुन आली. स्थानिक गुन्हे शााखेचे प्रभारी अधिकारी शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या. या पथकाने गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमी वरून 11 ऑगस्ट रोजी महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने सलाम नगर अकोट फाईल येथे राहणा-या एका संशयित महिलेस कायदेशीर रित्या ताब्यात घेतले. गुन्हयाबाबत कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता, तिने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपी महिलेकडुन गुन्हयातील चोरी गेलेले एक प्लेन सोन्याची कानातली बाळी अंदाजे वजन 400 मि.ली.किंमत अंदाजे तीन हजार रुपये, दोन तिन लाईन स्टोन वाली सोन्याचे कानातली बाळी वजन अंदाजे 1 ग्राम 500 मिली किंमत अंदाजे दहा हजार रुपये, दोन सिंगल लाईन स्टोन सोन्याची बाळी वजन अंदाजे 2 ग्राम 500 मिली की अंदाजे 18 हजार रूपये असे एकुण सोन्याचे 05 नग रिंग एकुण वजन अंदाजे 4 ग्राम 400 मिली. किंमत अंदाजे 31,800 रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय 20 जुलै 2024 रोजी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अकोला हद्दीतुन PNG ज्वेलर्स मधुन सोन्याचे दागिने चोरी केल्याबाबत पोलीस स्टेशनला अप क्र. 406/2024 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्हयातील सि.सि.टी.व्ही. फुटेजची पडताळणी केली असता, अटक करण्यात आलेल्या याच बुरखाधारी महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले. या महिला आरोपीने चोरी केली असल्याचे कबुली दिली. आरोपी महिलेने चोरी केलेले सोन्याचे दागिने विकुन मोबदल्यात मिळालेली रक्कम जप्त करण्यात आली.
या आरोपी महिलेस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरिक्षक गोपाल जाधव, सहायक पोलीस उपनिरिक्षक गणेश पांडे व सहकारी फिरोज खान, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, धिरज वानखडे, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, स्वप्नील चौधरी, स्वप्ना चौधरी, ज्योत्स्ना लाहोळे यांनी केली.
जनतेस आवाहन
सध्या श्रावण महिना सुरू असल्याने राजराजेश्वर मंदीरामध्ये भाविक देव दर्शनाकरिता मोठया संख्येने येत आहेत. 05 ऑगस्ट रोजी पहिल्या श्रावण सोमवारी एका महिलेचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र चोरी गेल्याची घटना घडली आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मंदीरामधील सि.सि.टी.व्ही. फुटेज प्राप्त केले आहेत. यावरून आरोपी महिलेचा शोध घेवुन लवकरच गुन्हा उघड करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. श्रावण महिन्यात गर्दीच्या ठिकाणी जातांना महिलांनी मौल्यवान वस्तु परिधान करण्यास टाळावे,असे आवाहन जिल्हयातील सर्व जनतेला अकोला पोलीस विभागाने केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा