- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-crime-against-humanity: अकोल्यात घडली नात्याला काळिमा फासणारी घटना; 10 वर्षीय बालिकेवर नातेवाईकाकडून अत्याचार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : कोलकाता आणि बदलापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्या आहेत. राज्यात आणि देशात अल्पवयीन मुलींवर आणि महिलांवर रोजचे अत्याचार सुरू आहेत. याच श्रृंखलेतील अकोला जिल्ह्यातील काझीखेड येथे गुरू शिष्याला काळिमा फासणारी घटना ताजी असताना अकोल्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.
तेल्हारा तालुक्यातील 10 वर्षीय मुलगी अकोल्यातील हिंगणा तामसवाडी येथे आपल्या नातेवाईककडे (वडिलांचा मामे भाऊ) राहायला होती. आरोपीची पीडित चिमुकलीवर आधीपासूनच वाईट नजर होती. वर्षभरापूर्वी घरात कोणी नसताना आरोपी यश युवराज गवई ( रा. हिंगणा तामसवाडी ) याने पीडित मुलीवर जबरदस्ती करीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. याबाबत कोणालाही सांगितल्यास तू माझ्या सोबत स्वतःच्या मर्जीने हे सर्व करत असल्याच आपण तुझ्या वडिलांना सांगणार, अशी धमकी पिडीत मुलीला आरोपीने दिली होती. यानंतर तो वारंवार पीडितेवर अत्याचार करीत होता.
रोजच्या अत्याचाराला कंटाळलेल्या मुलीने अखेर आपबिती काल आपल्या वडिलांना सांगितली. मुलीच्या भेटीला वडील आले असता, वडिलांसमोर पीडित मुलीने 30 ऑगस्ट 2023 पासून ते कालपर्यंत आरोपी कडून झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. संपूर्ण घटनाक्रम सांगितल्या नंतर वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठून आरोपीचे कृत्य उघडकीस आणले.पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी विरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने 20 वर्षीय आरोपीला अटक केली. पोलिसांनी बीएनएस आणि पोक्सो कायदा अंतर्गत आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, या प्रकरणाचा अधिक तपास अकोट फाईल पोलीस करीत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी यांनी दिली.
23 ऑगस्ट 2024 रोजी पीडीतचे वडील (फिर्यादी) यांनी पोलीस स्टेशनला पिडीतेसह येवुन रिपोर्ट दिला. पिडीता हिने माहीती दिली की, तिचे नात्यातील तिचे वडीलांचा मामे भाऊ यश युवराज गवई (वय 20 वर्षे) याने पिडीत हिला धमकावून तिचे सोबत वारंवार लैंगिक अत्याचार केला. अशा प्रकारे पिडीताने तिचे वडीलांना दिलेल्या माहीती वरून फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यावरून पोलीस स्टेशन अकोट फाईल येथे भारतीय न्याय सहीता कलम 64, 64 (2) (एफ) (एम), 65, (2), 333, 351(2) (3), तसेच बाल लैगिक अत्याचार कायदा कलम 4, 5(एल) (एम) (एन), 6 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्हयातील आरोपी यश युवराज गवई (वय 20 वर्ष रा हिगणा तामसवाडी ता.जि अकोला) याला तात्काळ अटक करण्यात आली असुन पोलीस अधिक्षक, अकोला, अपर पोलीस अधिक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला यांचे मार्गदर्शनात गुन्हयाचा तपास म.स.पो.नि. चंद्रकला मेसरे या करीत आहेत,अशी माहिती गजानन राठोड सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन अकोट फाईल, अकोला यांनी दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा