akola-city-crime-bereft-body-k: तो बेवारस मृतदेह नेमका कुणाचा?मृतकाचे जवळील आधारकार्डवर उत्तराखंडचा पत्ता, तपास जारी






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील विद्युत भवन जवळ असलेल्या एका बंद हॉटेलच्या परिसरात सायंटिस्टचे ओळखपत्र असलेला मृतदेह काल शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी रात्री कुजलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.



हा बेवारस मृतदेह गेल्या दोन ते तीन दिवसांपासून येथेच पडून होता. या मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार उघडकीस आला. विशेष बाब म्हणजे या मृत व्यक्तीच्या खिशात सायंटिस्टचे सरकारी ओळखपत्र निघाल्याने तर्क वितरकांना उधाण आले आहे. मृत व्यक्तीच्या खिश्यात सरकारी ओळख पत्र, आधार कार्ड, विविध बँकांचे क्रेडिट कार्ड तसेच बिना सहीचे कोरे चेक सुद्धा पोलिसांना आढळले आहेत. 



मृतदेहाच्या पाकिटात निघालेल्या ओळखपत्रावर डॉक्टर के. एल. नारायण राव अर्थ सायंटिस्ट असे नमूद असून आधारकार्ड वर नाव के. एल. लक्षीनारायण पत्ता द्वारा वेंकट सुभहाईह राव, वॉर्ड नं 8 , हाउस नं 74, भवाली रोड, मल्लिताल भीमताल, जूनस्टेट, नैनीताल, उत्तराखंड असा नमूद आहे.



या मृतदेहा जवळ सापडलेल्या सायंटिस्टचे ओळखपत्र विविध बँकांचे क्रेडिट कार्ड पाहता नेमकी हीच ती व्यक्ती आहे का ? असेल तर हा व्यक्ती अकोला शहरात आला कसा ? याचे नातेवाईक नेमके कोण? या सह इतरही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासत आहेत.

टिप्पण्या