thieves-new-style-of-stealing : चोरट्यांची चोरी करण्याची नवी स्टाईल; मनपसंत कपडे चोरून चोरटे पोबारा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस आणि रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. आज पहाटे सुमारे 5 चोरट्यांनी एल आर टी महाविद्यालय रोड वरील एका मोठ्या कपड्याच्या दुकानात म्हागड्या कपड्यांसाठी चोरी केली.





चोरट्यांनी दुकानाच शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. चार आत घुसले तर एक दुकाना बाहेर पहारा देत फिरत होता. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. चोरट्यांनी आपल्या पसंतीचे व मापाचे कपडे यावेळी निवडले आणि तेथून पोबारा केला. 




दरम्यान एका दुसऱ्या चोरीच्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी न्यायधिशांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुचाकी गाड्यांच्या स्पेआर पार्टच्या दुकानाचे शटर वाकवून रोख रक्कम पळविली. या दोन्ही चोरी मधील चोरट्यांची टोळी एकच आहेत की वेगवेगळे हा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा आहे. पोलीस आता सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. 




काही महिन्यापूर्वी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या अलंकार मार्केट मध्ये एकाच रात्री नऊ दुकाने फोडण्याची घटना घडली होती. यातील आरोपी गजाआड झालेत. मात्र वारंवार अश्या घटना शहरात घडत असल्याने  आता व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आजच्या घटनेमुळे रात्रीचा पोलीस गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




टिप्पण्या