stampede-satsang-in-hathras: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी; 27 जणांचा मृत्यु, अनेक जण गंभीर जखमी





उत्तर प्रदेश:  हाथरसमध्ये सत्संग सुरू असताना चेंगराचेंगरी होऊन 27 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तर अनेक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये 23 महिला, 3 बालक व एका पुरुषाचा समावेश असल्याचे कळते. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



प्राप्त माहितीनुसार, भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु होता.  हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलराई गावात ही दुर्घटना घडली. 



या घटनेतील मृतकाचे शव विच्छेदन तपासणी आणि पुढील कार्यवाहीसाठी  एटा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत. या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने मदत कार्य सुरू केले आहे.



टिप्पण्या