- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
political-news-akola-mahayuti: विधानसभा निवडणूकीत महायुतीचा झेंडा रोवण्यासाठी कामाला लागा- चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करताना
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जनतेशी संवाद साधून कार्यकर्त्यांचा सन्मान करून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा रोवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
स्थानिक सिटी स्पोर्ट येथे अकोला महानगर ग्रामीण जिल्हा तसेच यवतमाळ पुसद जिल्हा अमरावती ग्रामीण अमरावती शहर वाशिम संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर आमदार संजय कुटे, भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोटेकर, खासदार अनुप धोत्रे, खासदार अनिल बोंडे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार मदन ऐरावत, आमदार संदीप धुर्वे, आमदार लखन मलिक, माजी आमदार प्रवीण पोटे, आमदार आकाश कुडकर, आमदार श्वेता महाले, माजी मंत्री रणजीत पाटील, चैनसुख संचेती, किशोर पाटील, जयंत मसने, श्याम बडे, विजय अग्रवाल आदी विराजमान होते.
एक ऑगस्ट ते निवडणूक संपेपर्यंत कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा विकास करण्याच्या दृष्टीने व महायुतीचे सरकार स्थापनेच्या करिता सरकारने केलेल्या योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर्स मोफत करण्याच्या दृष्टीने केलेली योजना याचा लाभ तसेच लाडका भाऊ, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना व सरकारने केलेले कामकाज मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या योजना घरोघरी पोहोचवा, तसेच जुने नवीन कार्यकर्त्यांचा संगम एकत्रीकरण करून परिवार तसेच धार्मिक सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्राच्या नागरिकांशी संवाद साधा असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
यावेळी डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी आगामी कार्यक्रम रक्षाबंधन तसेच 15 ऑगस्ट व विविध राष्ट्रीय कार्यक्रमात सोबत पक्षाच्या विविध कार्यक्रमाची रूपरेषा मंडळ निहाय बैठका व मतदार नोंदणी सर्व बाबींचा आढावा घेतला.
यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी सामाजिक दायित्वासोबत देशाला सुजलाम सुजलाम करण्याच्या दृष्टीने विश्वातील सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी असून, कार्यकर्त्यांनी एखाद्या विषयावर मतभेद असणे वेगळे असू शकते; पण मन भेद करणाऱ्या पासून सावध राहून केवळ तीन टक्के मतामुळे आपण महाराष्ट्रात 17 लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदान नोंदणी व जनतेशी संवाद कार्यकर्त्यांची संवाद साधावा, असे यावेळी आमदार सावरकर यांनी सांगितले.
जिल्हा निहाय य पदाधिकाऱ्यांची व सरकारच्या योजना पोहोचवण्याच्या दृष्टीने उपाययोजना व त्याचे महत्व व त्यासाठी करावे लागणाऱ्या योजना यासंदर्भात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर आमदार संजय कुटे यांनी माहिती दिली.
यावेळी 16 आमदार, दोन खासदार, आठ माजी आमदार तसेच जिल्हाध्यक्ष मंडळ अध्यक्ष सहित नऊ जिल्ह्यातील 442 पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने शंखनाद केला असून, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, किशोर पाटील, माधव मानकर, जयंत मसने, विजय अग्रवाल तसेच भाजपा महिला आघाडी भारतीय जनता युवा मोर्चा व विविध आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
प्रारंभी भारत माता तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते उमरी येथील विजय मदनकर व शुभम तोडकर तसेच रामदास साबळे बूथ प्रमुख यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीत भर पावसात वणी ते सिंदखेड राजा टोकापासून कार्यकर्ते सहभागी झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा