obc-reservation-elections-mh: उद्याच्या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढणार - ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : मराठा आरक्षण करिता उद्या सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली आहे.  मात्र या बैठकीत ओबीसी आरक्षणाला जर धक्का लागल्यास तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत 288 जागा लढवून ओबीसीला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडू असा इशारा ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांनी दिला.


आज अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकाशअण्णा शेंडगे हे अकोल्यात ओबीसी बहुजन पार्टीची अमरावती विभागीय बैठकी साठी आले होते. 


ओबीसी आरक्षणाला हात लवणाऱ्याचा हात काढून घेऊ असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिला. येणारी निवडणूक ही ओबीसी विरुद्ध मराठा होणार असून आम्ही तयारीला लागलो असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं.


बिहार राज्यात ओबीसी जनगणना झाली असल्यामुळे तेथे ओबीसीची वास्तव स्थिती कळून चुकली आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात आम्ही जात निहाय जनगणना करणे गरजेचे आहे. कारण संविधानांत ओबीसीला 27 टक्के आरक्षण दिले गेले आहे. मात्र या 27 टक्के मध्ये जरांगे यांच्या मार्फत मराठा समाज घुसू पाहत आहे. राज्य सरकार त्यांचे लाड पूरवित आहे. सरकारने मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी  न्यायालयीन लढाई सुरु आहे तर राजकीय मार्गाने आरक्षण रक्षणासाठी ओबीसी बहुजन पार्टी स्थापन झाली असून ही पार्टी महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक मध्ये संपूर्ण 288 जागा लढविणार असून त्याची संपूर्ण तयारी पार्टीने केली असल्याची माहिती प्रकाश अण्णा शेंडगे यांनी यावेळी  दिली.




नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या आहेत. पुढील तीन महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धोका संभवत आहे. ओबीसीच्या अस्मितेचा अस्तित्वाचा व आरक्षणाचा  प्रश्र निर्माण झाला आहे. या पार्शभूमीवर ओबीसी जनमोर्चा या सामाजिक संघटनेतून ओबीसी बहुजन पार्टींचा उदय झाला आहे. ही पार्टी विदर्भामध्ये असलेल्या सर्व 62 विधानसभा मतदार संघमध्ये आपले उमेदवार उतरवीत आहे.असेही त्यांनी सांगितले. 


यावेळी ओबीसी बहुजन पार्टी उपाध्यक्ष   प्रा. टी.पी मुंडे, राष्ट्रीय महासचीव  चंद्रकांत बावकर, कोषाध्यक्ष जी.डी तांडेल,  व्हि.डी काळे, अनिल शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे (गोबरे), माजी आमदार तुकाराम बिरकड, डॉ अशोक ओळंबे, माजी आमदार नारायण गव्हाणकर, जयंत मसने, अमरावती विभागीय अध्यक्ष  सुभाष सातव, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर, ओबीसी जनमोर्चा अकोला जिल्हाध्यक्ष आकाश कवडे , महिला जिल्हाध्यक्ष  सुनीता सरोदे , माया इरतकर, ओबीसी बहुजन पार्टी जिल्हाध्यक्ष ऍड. दाते, अकोला महिला जिल्हाध्यक्ष मीना कवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या