- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
mla-mitkaris-car-vandalized: मनसे सैनिक आक्रमक; आमदार मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड, कर्णबाळा दूनबळे यांच्या पत्रकार परिषदेनंतर घडला प्रकार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*अकोल्यातील राजकीय वातावरण तापले
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरूद्ध राष्ट्रवादी काँगेस (अजित पवार गट)
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्ताव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. आज मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अकोला शहरातील शासकिय विश्रामगृह येथे आमदार अमोल मिटकरी आले असता, मनसे सैनिकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात मनसे सैनिक होते. मात्र प्रसंगावधान राखत अमोल मिटकरी हे आपल्या दालनात (अँटीचेंबर) पोहचले होते.
मनसे सैनिकांनी आमदार मिटकरी यांचा निषेध करीत घोषणाबाजी करीत दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न निष्फळ झाला. अमोल मिटकरी दालनात कार्यकर्त्यांसोबत बसले होते. दरम्यान मनसे सैनिकांनी बाहेर उभी असलेली त्यांची गाडी फोडली.
पत्रकार परिषदेनंतर घडला प्रकार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक कर्णबाळा दुनबळे यांची आज मंगळवार 30 जुलै रोजी दुपारी 12-30 वाजता शासकीय विश्रामगृह, नवीन बस स्टँड जवळ,अकोला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषद मनसेचे स्थानिक मुख्य पदाधिकारी राजेश काळे, पंकज साबळे यांनी आयोजित केली होती.
या पत्रकार परिषदेत कर्णबाळा दूनबळे यांनी राज ठाकरेंवर आरोप करणाऱ्या मिटकरींना झोडून काढा, असा इशारा कार्यकर्त्यांना दिला. मिटकरींच्या तोंडाला पांढरे फासून हातात बांगड्या घालाव्यात, असे मनसे कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
पत्रकार परिषद आटोपल्यानंतर काही वेळातच आमदार मिटकरी हे शासकिय विश्रामगृहावर आले, याची भनक मनसे सैनिकांना मिळताच त्यांनी मिटकरींच्या गाडीकडे धाव घेतली. तोवर आमदार मिटकरी हे दलानात पोहचले होते. तेवढ्यात कार्यकर्त्यांनी बाहेर उभी असलेली मिटकरींची कार फोडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी घटनास्थळी शासकिय विश्रामगृह येथे पोहचून पाहणी केल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांची भेट घेतली. या घटनेनंतर अकोला शहरातील राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी व मनसेचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येवून परस्परांना विरूद्ध निषेध नोंदविला.
घटनेनंतर आमदार मिटकरी यांची पहिली प्रतिक्रिया
“अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला, माझ्या गाडीची तोडफोड केली आणि काही कुंड्या देखील माझ्या गाडीवर फेकून मारल्या, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने मी त्या गाडीत नव्हतो, आणि माझ्या सहकाऱ्याला देखील काही झाले नाही. याला आम्ही त्यांच्या पद्धतीने उत्तर देऊ शकलो असतो. परंतु आमची तशी परंपरा नाही.”
-आमदार अमोल मिटकरी
अकोला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा