martyr-praveen-janjal-state honors: अखेरचा हा तुला दंडवत ! शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, साश्रू नयनांनी गावकऱ्यांनी दिला शेवटचा निरोप





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ हे चिनीगाम, जम्मू-काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या जन्मगावी मोरगाव भाकरे येथे आणण्यात आलं. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.



जम्मू-काश्मीरमधील चिनीगाम मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शूर जवान प्रवीण जंजाळ आणि त्यांचे साथीदार शहीद झाले. काही दहशतवादी कुलवाम मध्ये घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली. आणि त्यानंतर लष्करी कारवाई सुरू झाली. या कारवाईत भारतीय सैन्याने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला.


जंजाळ हे  2020 मध्ये सैनिकात भरती झाले होते. आणि महार बटालियनमध्ये कार्यरत होते. आई - वडील , विवाहित बहीण आणि मोठा भाऊ असा मोठा परिवार त्यांच्या मागे आहे. आज प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी मोरगाव भाकरे येथे आणण्यात आले तिथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अकोला पोलीस व महार रेजिमेंटच्या जवानांसह उपस्थित हजारो नागरिकांनी प्रवीण जंजाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.



जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहिद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. त्यांच्यावर आज मोरगाव भाकरे येथे राजशिष्टाचारानुसार व बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले.



शहिद प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव सैन्यदलाच्या तुकडीकडून मूळ गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाची तुकडी, तसेच पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.


खासदार अनुप धोत्रे, खासदार बळवंत वानखडे, आमदार नितीन देशमुख, आमदार संजय कुटे, जि.प.अध्यक्ष संगीता अढाऊ, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्यदलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ‘शहिद प्रवीण जंजाळ अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर निनादला होता.




सैनिकांचे गाव म्हणुन मोरगांव भाकरे गावाची ओळख असून येथे आजवर 90 युवक सैन्यात भरती झालेले आहेत. शहीद जवान प्रविण जंजाळ यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.


  अशोक वाटिका येथे अभिवादन



जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण जंजाळ हे शहीद झाले. शहीद जवानाचे पार्थिव गावात आज अशोक वाटिका अकोला शहर येथे पोहोचले असता महार बटालियन आजी माजी सैनिक आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने शहीद सैनिकाचा ट्रक सजवला. 

विश्व भूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे महार रेजिमेंट सुरू झाली होती. त्यामुळे शाहीदाचे पार्थिव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर ठेवून शाहिदाचे कुटुंबाचे हस्ते बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देवून पुष्प अर्पण करीत शहीद जवान प्रवीण जंजाळ ह्यांना अभिवादन करण्यात आले. 



व्याळा मार्ग पार्थिव मोरगावात 



त्यानंतर शहीदाचे पार्थिव त्यांचे मोरगाव भाकरे गावात अकोल्यावरून नेताना डाबकी भौरद नाल्याला पूर असल्याने व्याळा मार्गे गायगाव भौरद ते मोरगाव भाकरे नेण्यात आले. वाटेत मोठ्या प्रमानात नागरिक शहीदाला अभिवादन करायल जमले होते.









टिप्पण्या