- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
kedia-house-robbery-case-akl: केडीया हाऊस दरोडा प्रकरण : गँगस्टर हेमंत लूनियाला इंदोर येथे अकोला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गुन्ह्यात वापरलेली कार जप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: न्यू आळशी प्लॉट येथे राहणारे व्यवसायिक नवल केडीया यांच्या घरी जबरी चोरी प्रकरणात मध्यप्रदेशातील कुख्यात रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार हेमंत लुनिया यास अकोला स्थानिक गुन्हे शाखाने इंदौर येथून गुन्हयात वापरलेल्या ईरटीगा कार सह अटक करण्यात यश मिळविले आहे.
कुख्यात गुंड हेमंत लुनिया याचे विरूध्द मध्यप्रदेश राज्यामध्ये खुन करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, डेपो मधून डिझेल चोरी, अवैधरित्या दारू विक्री, पॅरोल वरून फरार राहणे असे गंभीर स्वरूपाचे एकुण 21 गुन्हे दाखल आहेत.
10 जुन 2024 रोजी हेमंत लूनिया हा त्याचे साथीदारासह इंदोर (भारत पेट्रोलीयम) ची पाईप लाईन फोडून त्यामधून मोठ्या प्रमाणात डिझेलची चोरी करून फरार होवून नाशिक येथे आला होता. येथेच त्यांनी केडीया दरोड्याचा प्लॅन (कट) रचला. या गुन्हयात तीन आरोपी अटक झाल्याबाबत आरोपी हेमंतला माहीती मिळाल्याने त्याचे दोन्ही मोबाईल बंद करून फरार झाला होता. त्यामुळे त्यास अटक करणे पोलिसंकरिता आव्हानात्मक होते. मात्र मोठ्या शिताफीने पोलीस आरोपी पर्यंत पोहचले. या आरोपी कडून केडीया दरोडा प्रकरणात वापरलेले वाहन मारूती कंपनीची पांढऱ्या रंगाची ईरटीगा कार जिचा क्रमांक MP-09-ZM-8468 जप्त करण्यात आली आहे.
27 जून 2024 रोजी न्यु आळशी प्लॉट अकोला येथील रहिवासी नंदकिशोर अमृतलाल केडीया यांचे घरात अज्ञात लोकांनी दरोडा टाकुन त्यांचे घरातुन नगदी रूपये आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जबरीने चोरून घेवून गेले होते. अश्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खदान अकोला येथे अप.नं 521/2024 कलम 452,392,397,34 भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करुन तपासास घेण्यात आला होता.
या गुन्हयात यापुर्वी पोलीस स्टेशन खदान येथील पोलीस उपनिरिक्षक मुकूंद देशमुख, पोलीस हवालदार निलेश खंडारे यांनी आरोपी पुष्पराज यास सुरत येथून अटक केली होती. तसेच स्थानीक गुन्हे शाखा अकोलाने सदर गुन्हयात पोलीसांचा गणवेश धारण करून आपण पोलीस असल्याची बतावणी करणारा आरोपी विनायक उर्फ विक्की दिलीप देवरे (वय 34वर्ष रा. सावरकर नगर मनमाड जि. नाशिक) यास मनमाड येथून तसेच सचिन अशोक शहा (वय 38 वर्ष रा. पंचवटी नाशिक) असे दोघांना शिताफीने ताब्यात घेवून पोलीस स्टेशन खदान यांचे ताब्यात देण्यात आले होते.
या गुन्ह्यातील वाहन व ईतर आरोपीतांना तात्काळ अटक करणे बाबत पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळेक यांना आदेशीत केले होते. शंकर शेळके यांनी पुन्हा एक पथक गठीत करून त्यांना गुन्हयात वापरलेले वाहन आणि ईतर आरोपीतांचा शोध घेण्याकरिता रवाना केले होते. पथकाने त्यांच्या गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषना व्दारे आरोपी हेमंत पुनमचंद लुनिया (वय 48 वर्ष रा. नावदा ता. महू जि. इंदौर) यास शिताफीने अटक करून त्याच्या पासुन गुन्हयात वापरलेले मारूती कंपनीची पांढऱ्या रंगाची ईरटीगा कार जिचा क्रमांक MP-09-ZM-8468 जप्त करण्यात आली. आरोपीस व जप्त कार पुढील तपास कामी पोलीस स्टेशन खदान यांचे ताब्यात देण्यात येत आहे.
यांनी केली यशस्वी कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरिक्षक शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस उपनिरिक्षक गोपाल जाधव व सहकारी अब्दुल माजीद, सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीम शेख, खुशाल नेमाडे, कूळ चव्हाण,, मोहम्मंद आमीर, शेख अन्सार, स्वप्नील खेडकर, प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे यांनी केली आहे.
हेमंत लूनियावर अनेक गुन्हे दाखल
कुख्यात गुंड हेमंत लुनिया याचेवर मध्य प्रदेशातील किशनगंज, राजेंद्र नगर,
छत्रीपुरा, अन्नपूर्णा, बेटमा, पिथमपुर,
सागीर, सागौर, पलासिया आदी पोलीस स्टेशन मध्ये विविध कायदा कलमान्वये
गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कुख्यात गुंडाला बेड्या ठोकण्यात अकोला पोलिसांना यश मिळाले, हे येथे उल्लेखनीय आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा