hit-and-run-case-in-akola-city : अकोल्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरण: कारसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात; भरधाव कारने दुचाकीला उडवले; पत्नी ठार, पती गंभीर जखमी





ठळक मुद्दा 

भरघाव वेगाने निष्काळजी गाडी चालवून अपघात केलेल्या चालकास ताब्यात घेवून त्याचे कडील गाडी जप्त. स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांची कार्यवाही




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अशोक वाटिका चौकातील उड्डाणपुलावर पाठीमागून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला व पुरुष गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. आरोपी कारचालक गाडीसह घटनास्थळावरुन पळून गेला होता. आज रविवार दुपारी या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला.


काल दुपारी केशवनगर येथील तानाजी दगडू सांगळे आणि त्यांच्या पत्नी रेखा तानाजी सांगळे हे दोघे अकोला रेल्वे स्थानकावरून मोटारसायकलने घराकडे परत जात होते. रेल्वे स्टेशनकडून उड्डाणपुलावर आले असता, अशोक वाटिका चौकातील उड्डाणपुलावर पाठीमागून येणाऱ्या कार क्रमांक एमएच 02 ए क्यू 7901 ने सांगळे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 30 एक्स 779 गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रेखा तानाजी सांगळे (वय 50) या गंभीर जखमी झाल्या होत्या. तर त्यांचे पती तानाजी दगडू सांगळे (वय 55) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे होते.



वैभव तानाजी सांगळे (रा. केशव नगर कोंडाना बिल्डींग अकोला)  यांनी 13 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे आई वडील असे दोघे मोटार सायकल क्रमांक MH-30-X-779 वर क्रिकेट स्टेडीयम ते जेल चौक असलेल्या पुलावरून जेल चौकाकडे जात असताना, दुपारी 2 वाजताचे सुमारास जेल चौक कडे येणा-या कारने त्याचे मोटार सायलकलला मागुन ठोस मारून अपघात केला होता. त्यामध्ये वैभव सांगळेचे वडील आणि आई हे जखमी झाले होते. 


उपचारा दरम्यान त्यांची आई  मरण पवाल्यामुळे गाडी क्रमांक MH-02-AQ-7901 च्या चालका विरुध्द पोलीस स्टेशन सिव्हील लाईन अकोला येथे अप नं 394/24 कलम 106 (1), 281,125 (अ), 125 (ब) बी. एन. एस 2023 सह कलम 134,177 मोटर व्हेकल ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद असून गाडी चालक हा गाडी सह फरार होता.


गुन्हयाचे महत्व लक्षात घेता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आरोपी गाडी चालक यास तात्काळ ताब्यात घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख  शंकर शेळके यांना आदेशीत केले. शंकर शेळके यांनी त्यांचे अधिनीस्त पथक तयार करून त्यांना तात्काळ अपघात केलेल्या चालकास गाडी सह ताब्यात घेण्याकरिता मार्गदर्शन केले. शंकर शेळके यांच्या नेतृत्वात पथकाने रात्र भरात गोपनिय माहीतीच्या तसेच तांत्रिक विश्लेषनाव्दारे गाडी क्रमांक MH-02-AQ-7901 ही गंगानगर येथून ताब्यात घेतली. मात्र आरोपीचा ठाव ठिकाणा नव्हता. आरोपीला शोधण्यात पथके रवाना केलेत. अशातच गोपनीय सूत्राकडून आरोपी दडून बसलेल्या ठिकाणची पक्की खबर लागली. क्षणाचाही विलंब न करता पथक आरोपीच्या जवळ जावून त्याला जाळ्यात अडकाविले. आरोपी ईस्माइल अहेमद मुमताज अहेमद (वय 30 वर्ष रा. कागजीपुरा ताजनापेठ अकोला) यास ताब्यात घेतले. आरोपीस पुढील तपास कामी वाहनासह पोलीस स्टेशन सिव्हील लाईन अकोला यांचे ताब्यात देण्यात आले. 



कार्यवाही ही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे , पोलीस निरिक्षक  शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शिंदे व सहकारी अब्दुल माजीद, सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीम शेख, खुशाल नेमाडे, मोहम्मंद आमीर, शेख अन्सार, सतिश पवार, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, अमोल दीपके, प्रशांत कमलाकर यांनी केली आहे.



टिप्पण्या