consumer-protection-act-law : चोला मंडलम कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका; कोरोना रुग्णांना पॉलीसीचा लाभ देण्यास टाळाटाळ






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: कोरोना रुग्णांना पॉलीसीचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चोला मंडलम कंपनीलाला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे.

कोरोना संकट काळात कोरोना झालेल्या रुणांनी काढलेल्या पॉलीसीचा लाभ देऊन त्यांना क्षती पूर्ती देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला. मोहम्मद अली रोड परीसरातील रहिवाशी मो. रफिक जकरिया व जामा मस्जिद अत्तर गल्ली येथील रहिवासी सै. सफदर अली या दोन नागरिकांनी वेगवेगळ्या तिथीस कोरोना काळात कोरोना रुग्णासाठी असलेली चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीची दीड लाख रुपये देय असणारी पॉलिसी घेतली होती. 



रुग्णास कोरोनाची लागण झाल्यास त्याच्याकडे शासकीय कोरोना चाचणीचा अहवाल व तो 72 तास तो शासनमान्य अधिकृत कोरोना उपचार असणाऱ्या रुग्णालयात उपचारासाठी भरती राहिला पाहिजे आदी अटी या पॉलीसीच्या अनुषंगाने ठेवण्यात आल्या होत्या. मो रफिक जकरिया यांना कोरोनाची लागण होऊन ते 19 जानेवारी 2021 ते 25 जानेवारी 2021 हॉटेल रेजन्सी कोविड डेडीकेटेड सेन्टर येथे उपचारासाठी भरती झाले. त्याचप्रमाणे सै. सफदर अली यांना कोरोनाची लागण होऊन ते दि 13 फेब्रुवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत उपचारार्थ रावणकार हॉस्पिटल स्कायलार्क कोविड सेन्टर येथे भरती झाले होते. उपचारानंतर दोन्ही रुग्ण बरे होऊन त्यांनी चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीकडे पॉलिसीच्या मॅच्युरिटीसाठी सर्व कागदपत्रे दाखल केलीत. मात्र कंपनीने क्लेम देण्यास टाळाटाळ करीत सेवेत कमतरता व न्यूनता केली. 


कंपनीने क्लेम न देता समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. सबब उपरोक्त दोन्ही नागरिकांनी ॲड. इल्यास शेखानी यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात क्षतीपूर्ती साठी दावा दाखल केला. आयोगाने दोन्ही पक्षाची सुनावणी घेत यात चोलामंडलम इन्शुरन्स कंपनी दोषी आढळून आली. 


सबब कंपनीने तक्रारदार मो रफिक जकरिया व द्वितीय तक्रारदार सै सफदर अली यांना प्रत्येकी पॉलीसीची राशी दीड लाख रुपये, मानसिक त्रासपोटी 3 हजार रुपये व  प्रकरण खर्च 2 हजार रुपये 45 दिवसाच्या आत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सै सादिक अली बशर सैयद व सदस्य नीलिमा बेलोकार यांनी दिला. तक्रारदार यांच्या वतीने ॲड. इल्यास शेखानी यांनी बाजू मांडली.

टिप्पण्या