complaint-against-zp-officers: गट विकास अधिकारीं विरूध्द तक्रार; पिडीत ग्रामसेविकेने घेतला टोकाचा निर्णय



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : न्याय मिळत नसल्याचा आरोप करत एका महिला ग्रामसेविकाने टोकाचा निर्णय घेत धरणात उडी मारून आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेतून ही महिला बचावली. मात्र हे प्रकरण आता पीडितेला त्रास देणाऱ्या व न्यायात अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व संघटना पदाधिकाऱ्यांवर चांगलेच पाचावर बसणार असल्याचे समजते.


अकोला जिल्हा परिषदेतील अकोट पंचायत समितीला कार्यरत ग्रामसेविकेने दोन गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील रामदासपेठ पोलिस स्टेशनला विनयभंगाची तक्रार दिली होती. मात्र त्यानंतर जिल्हा परिषद वर्तुळातील काही महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी यात राजकारण करून आपली पोळी शेकण्यासाठी त्या पीडित महीलेविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देवून तक्रारकर्ता महिलेला खोटे ठरवीत अधिकाऱ्यांना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणानंतर महिलेची मानसिक अवस्था विचलित झाली असल्याने तिने आज धरणात उडी घेवून जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ही महिला गेल्या 15 दिवसांपासून न्याय मिळण्यासाठी जिल्हा परिषदेत चकरा मारत असूनही तिला न्याय मिळणे तर दुरच परंतु तिलाच सेवेतून बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू होत्या.


आज या महिलेने अकोट तालुक्यातील पोपटखेडच्या धरणात उडी मारून जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील एकलव्य बचाव पथकाच्या सदस्यांना ही महिला उडी मारतांना दिसून आली आणि बचाव पथकाने तिला पाण्यातून बाहेर काढले.



या महिलेला प्राथमिक उपचार दिल्यानंतर अकोल्यातील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिलेची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

टिप्पण्या