भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलांचा सन्मान करणारी महत्वपूर्ण योजना आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे केले. मराठा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री जाधव म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी देशात व राज्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याने धूर मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना साकार होणार आहे. देशातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अनेकविध महत्वपूर्ण योजना अमलात येत आहेत. सामान्य नागरिकांचे हितासाठी व्यापक व योजना उपक्रम राबविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.
शहीद जंजाळ यांना श्रद्धांजली
जम्मू काश्मीर कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतावाद्यांशी झालेल्या चकमकीत जिल्हयातील मोरगाव भाकरे येथील प्रवीण प्रभाकर जंजाळ या जवानाला वीरमरण आले. देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे वीर प्रवीण जंजाळ यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.
असा झाला सत्कार कार्यक्रम
महायुतीच्या महाराष्ट्रात 200 जागा विजयी करण्याच्या दृष्टीने तसेच देशाला सुजलाम सुफलाम करण्याच्या साठी शेतकरी राजा समृद्ध व्हावा याकरिता मातृ शक्ती आणि जेष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राज्य आणि केंद्र सरकारने सुरू केले आहे त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य मिळून देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामाला लागा नकारात्मक बाबी पेक्षा सकारात्मक बाबीचा प्रचार करा, असे आवाहन याप्रसंगी प्रतापराव जाधव यांनी केले.
स्वर्गीय नामदेवराव पोहरे सभागृहमराठा मंगल कार्यालय येथे विजय देशमुख यांच्या पुढाकाराने महायुतीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला पूर्वचे आमदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर हे होते तर मंचावर सत्कारमूर्ती खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार बळीराम सिरस्कार, विजय देशमुख, किशोर पाटील विजय अग्रवाल, श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, कृष्णा अंधारे, विठ्ठल सरप, निखिल ठाकूर, जयंत मसने, कृष्णा शर्मा, वसंत बाछुका, मनोज गायकवाड, नकिर खान, रहीम पेंटर, फैजाज खान, नितीन झापर्डे, दिलीप देशमुख, गौतम गवई, शशी चोपडे, संतोष डाबेराव, रमेश गायकवाड, माधव मानकर, यश सावल, अशोक परळीकर, संजय गोटफोडे, अजय मते, एडवोकेट देवाशिष काकड, उषा विरक, चंदा शर्मा, योगिता पावसाळे, पवन महाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना मोफत तसेच ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. त्यामुळे महाविकास आघाडी चलबिचल झाली आहे. त्यांच्या अपप्रचाराला न घाबरता महायुतीने सर्व मतदारांची संपर्क साधून एक दिलाने महायुतीचा उमेदवार आपणच आहोत या भावनेने काम करून विधानसभेत भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प करू या, असे आवाहन ना. जाधव यांनी केले.
यावेळी जाधव यांचा सत्कार महायुतीच्या वतीने विजय देशमुख, विजय अग्रवाल, जयंत मसने, किशोर पाटील, श्रीरंग पिंजरकर, कृष्णा अंधारे, अश्विन नवले यांनी केला. यावेळी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, पतंजली परिवार, शिक्षण संघर्ष संघटना, शिवसेना, युवा सेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, माजी नगरसेवक, होमिओपॅथिक महाविद्यालय व जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, नरेश पुरंगे परिवार, आस्था युवक फाउंडेशन, महाराष्ट्र योगा संघ, नवदुर्गा उत्सव मंडळ गांधी चौक, नवयुवक मंडळ, अजय मते युवा अध्यक्ष राष्ट्रवादी तसेच विविध 45 संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.
ज्येष्ठांचा सहकार्य व मोदी यांच्या नेतृत्वात अकोल्याचा विकास करू- खासदार धोत्रे
ज्येष्ठ सहकारी, वडीलधारी मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्ह्याच्या विकास करण्यासाठी आपण कधीबद्ध असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्याचा विकास होणार व अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदार व रहिवासी नामदार जाधव असल्यामुळे त्यांच्याकडे पालक म्हणून जबाबदारी म्हणून अकोल्यात विविध केंद्र सरकारच्या योजना मिळवण्यास आपण यशस्वी ठरू, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार अमोल मिटकरी, तुकाराम बिडकर, गोपीकिशन बाजोरिया, श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, विजय अग्रवाल यांची समयोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आरंभी मोरगाव भाकरे येथील प्रवीण जंजाळ या शहीद सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे आरंभी राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
केंद्रामध्ये महत्त्वाच्या समितीमध्ये नामदार प्रतापराव जाधव यांचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून तसेच पश्चिम विदर्भातून नामदार जाधव यांची निवड करून पश्चिम विदर्भाचा गौरव केला आहे. आपल्या कार्य कार्यकाळामध्ये पश्चिम विदर्भाचा विकास नामदार प्रतापराव जाधव करतील. तसेच प्रतापराव जाधव हे संतनगरी महापुरुषांच्या नगरी व प्रतिनिधित्व असल्यामुळे व त्यांच्या प्रयत्नाने अकोला जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाचे आयोजक विजय देशमुख यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी तर आभार प्रदर्शन जयंत मसने यांनी केले.
भर पावसात सुद्धा मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला मातृशक्ती, युवाशक्ती उपस्थित होती. समाजातील सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा