- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-police-field-test-on-road: पावसामुळे मैदानात चिखल; पोलीस भरती मैदानी चाचणी होणार रस्त्यावर, वाहतूक मार्गात बदल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला जिल्हा पोलीस दलाच्या 195 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 19 जून पासून सुरू आहे.
दोन दिवस पावसामुळे भरती प्रक्रिया बंद होती. जी 11 जुलैला आयोजित करण्यात आली आहे. 800 मीटरच्या मैदानी चाचणी करिता वापरण्यात येत असलेल्या पोलीस मुख्यालय येथील ग्राउंड सध्या पावसामुळे चिखलमय असल्याने ही मैदानी चाचणी आता उद्या रस्त्यावर घेण्यात येणार आहे.
या करिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. लक्झरी बस स्थानक ते बालाजी मोल खोलश्वर चौक पर्यंत मार्ग हा 1600 मिटर रनिंग करीता सकाळी 4 वाजता पासून ते दुपारी 2 वाजे पर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता तसेच वाहतुकीचा अडथळा होवु नये, याकरिता हा बदल करण्यात आला आहे. या भागातील रहिवाश्यांनी पर्यायी रस्त्याचा उपयोग करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मात्र या उमेदवारांपैकी अनेक उमेदवार हे ग्रामीण भागातील आहेत, त्यांनी धावण्याचा सराव हा मैदानावर केला आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यावर होणाऱ्या य चाचणीमुळे उमेदवारांना अडचण निर्माण होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा