akola-city-crime-murder-case: वाशिम बायपास चौकाजवळ युवकावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु

 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  वाशिम बायपास चौक जवळील टी पॉइंट जवळ शनिवार 13 जुलैच्या रात्री 10 वाजताच्या सुमारास अफरोज खान मनवर खान (वय अंदाजे 32, राहणार हमजा प्लॉट) याच्यावर अज्ञात युवकांनी चाकू सारख्या धारधार शस्त्राने प्राण घातक हल्ला केला होता. गंभीर जखमी या युवकाचा उपचार दरम्यान आज सकाळी मृत्यु झाला.


प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, काल रात्री घटनास्थळी गंभीर जखमी झालेल्या अफरोज खान याला नागरिकांच्या सहकार्याने काल रात्री लगेच शासकिय रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. त्यानतंर खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने आज रविवारी सकाळी अफरोज खान याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


काल रात्री घटनेची माहिती जुने शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितिन लेवरकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. आणि पुढील प्रकिया सुरू केली. दरम्यान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. 



जुने वैमनस्यातून प्राणघातक हल्ला करून गुन्हेगारांनी अफरोजची हत्या केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहे.

टिप्पण्या