akola-akot-court-session-case: मुली सोबत गैरवर्तन; आरोपीला 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोट तालुक्यातील एका  अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्या सोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी आरोपीला 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व 31 हजार रूपये दंड अशी शिक्षा आज अकोट न्यायलयाने ठोठावली आहे.


दिनांक 09 जुलै 2024 रोजी अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश  बी.एम. पाटील यांनी सत्र खटला क्रमांक 28/2016 भादंविचे कलम 354-अ, 452, 323. सहकलम 7,8 पोक्सो प्रमाणे आरोपी विष्णु सुखदेव कसुरकार ,(वय 30 वर्षे रा. बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला) याने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडखानी व विनयभंग केल्याचे सिध्द झाल्याने आरोपीला भादंविचे कलम 354 -अ, ऐवजी सहकलम 7,8 पोक्सो प्रमाणे 3 वर्षे सश्रम कारावास 25 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 3 महीने अधिकचा सश्रम कारावास. तसेच भादंवीचे कलम 452 प्रमाणे आरोपीला 2 वर्षेचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 1 महीन्याचा सश्रम कारावास. तसेच भादेवीचे कलम 323 प्रमाणे 6 महीने सश्रम कारावास व 1 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 1 महीन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली.  अरोपीने दंड भरल्यास त्यापैकी 30 हजार रूपये पीडितेला देण्यात यावे.  सर्व शिक्षा आरोपीला एकत्रीतपणे भोगायची आहे, अशी शिक्षा विद्यमान कोर्टाने आरोपीला ठोठावली.


या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, 03 मे 2016 रोजी पीडितेने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपी विरूध्द फिर्यादी दिली होती. पीडिता आई वडिलांसोबत राहत होती. घटनेच्या दिवशी म्हणजे 03 मे रोजी सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान पीडितेचे आई वडील हे शेतात गेले होते. पीडिता व तिची छोटी बहीण घरात होत्या. अंदाजे 8.30 वाजेच्या दरम्यान आरोपी विष्णु कसूरकार हा नळाचा पाईप परत देण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरी येवून पिडीतेसोबत गैरवर्तन केले. पीडिता जोराने ओरडली तेव्हा आरोपीने पीडितेला धमकावून मारहाण करून घरातून निघुन गेला. आई वडील घरी आल्यानंतर पीडितेने आपबिती त्यांना सांगीतली व त्यांच्यासोबत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला जावुन आरोपी विरूध्द तक्रार केली. 

तक्रारी वरून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपास हाती घेतला. तपास अधिकारी पी.एस.आय बाळासाहेब नाईक यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकारी वकील जी.एल. इंगोले यांनी एकुण 7 साक्षीदारांच्या साक्षी या प्रकरणात नोंदविल्या, व युक्तीवाद केला, परंतु ते अनुपस्थित असल्याने आरोपीला या प्रकरणात शिक्षेची सुनावणी करतांना या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख न्यायालयात उपस्थित होते. व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादा नंतर विद्यमान कोर्टाने या खटल्यामध्ये 3 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा आरोपीस दंडासह ठोठावली.



टिप्पण्या