weather-update-rain-in-akola: अकोला जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला, दि. 24 : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात आजपासून दि. 28 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असेल, अशी अटकळ आहे.


वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. वीज चमकताना मोबाईल व वीज उपकरणे बंद ठेवावी. वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे. वीज पडण्याची सूचना मिळविण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  



        

टिप्पण्या