unethical-trade-in-guest-house: रेल्वे स्टेशन चौकातील गेस्ट हाऊस मध्ये अनैतिक व्यापार; लॉज मालकासह चार जणांना अटक, आरोपींना 18 जुन पर्यंत पोलीस कोठडी

   file images 





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रामदास पेठ पोलीस ठाणे हद्दीतील अकोला रेल्वे स्टेशन चौकात असलेल्या महावीर गेस्ट हाऊस येथे अनैतिक व्यापार चालविणा-या टोळीस शुक्रवारी रात्री धाड टाकुन पोलिसांनी हॉटेल मालकासह चार जणांना अटक केली. चारही आरोपींना शनिवारी न्यायालय समक्ष हजर केले असता चौघांनाही 18 जुन पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.


रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे 14 जुन रोजी FREEDOM FIRM नागपुर यांनी दिलेल्या माहीतीवरून व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांना प्राप्त माहीतीनुसार सापळा रचून महाविर गेस्ट हाउस रेल्वे स्टेशन चौक येथे धाड टाकुन कार्यवाही करण्यात आली. यावेळी एक अल्पवयीन पिडीता हिची पोलिसांनी सुटका केली. मुख्य आरोपी वैभव राजेश मिरजकर (वय 20, राहणार  बजरंग चौक देशमुख फैल अकोला),  हॉटेल मालक रविंद्र महावीर जैन (वय 44 वर्षे व्यवसाय महाविर गेस्ट हाउस रा. देशमुख फैल अकोला), कमल इंदरलाल थारानी (वय 45 वर्षे रा. टागोर नगर चौक रायपुर राज्य छत्तीसगढ) यांना जागीच धरून पीडीतने दिलेल्या बयानावरून आरोपी गणेश केशव पट्टेबहादुर (वय 29 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. तामसाळा पोस्ट केकतउमरा ता. जि. वाशीम) यास शिवणी अकोला येथुन ताब्यात घेतले. चौघांविरुद्ध रामदास पेठ पोलीस स्टेशन अकोला येथे 234/2024 कलम 372 भादंवि सहकलम 3,4,5,7 अनैतिक व्यापार प्रतिबधंक अधिनियम 1959 सहकलम 4 पॉक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोदं करून आरोपीतांना न्यायालय समक्ष हजर करून 18 जुन पर्यन्त पिसीआर प्राप्त करण्यात आलेला आहे.


ही कार्यवाही बच्चन सिंग पोलिस अधीक्षक अकोला, अभय डोगंरे अपर पोलिस अधीक्षक, सतिश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अकोला यांचे मार्गदर्शनाखाली मनोज बहुरे पोलिस निरीक्षक पो. स्टे रामदास पेठ अकोला, महीला सपोनि चंद्रकला मेसरे पो. स्टे जुने शहर तसेच उपविपोअ शहर विभाग पथक संदीप गुंजाळ, अनिल खडेकर, विनय जाधव,  रवि गिते, नदीम शेख नुर मोहम्मद, राज चंदेल, विद्या बांगर पो. स्टे जुनेशहर, सपोनि किशोर पवार आदींनी केली आहे, अशी माहिती रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मनोज बहुरे यांनी दिली.



प्राप्त माहितीनुसार मुख्य आरोपी  वैभव मिरजकर हा अल्पवयीन मुली व तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना या अनैतिक व्यवसायात ढकलत होता. यापूर्वी त्याने बऱ्याच मुलींना फसविले असल्याचे समोर येत आहे. याच्या जाळ्यात अडकल्यानंतर तो मुलींचे बनावट आधार कार्ड तयार करायचा. ग्राहक मिळाल्यानंतर शहरातील लॉजवर रूम बुक करुन मुलींकडून धंदा करवून घ्यायचा. यात शहरातील लॉज मालक व तेथील कर्मचारी यांना देखील ज्यादाचे पैसे देवून त्याच्या या गैरकृत्यात सामील करुन घ्यायचा. वैभव मिरजकर याचे अकोल्यात देशमुख फाईल आणि खोलेश्वर दोन्हीं ठिकाणी वास्तव्य असल्याचे समोर आले आहे.



दरम्यान, अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणच्या बऱ्याच लॉज व हॉटेलवर असे धंदे चालत आहेत. बाहेर जिल्हयातील व राज्यातील महिला येथे आणून अनैतिक धंदा करवून घेत असल्याचे या उघडकीस आलेल्या प्रकरणामुळे बाजार पेठेत दबक्या आवाजात चर्चा होत आहे. पोलिसांनी धाडसत्र राबवून अनैतिक व्यापारावर अंकुश ठेवावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून जोर धरू लागली आहे.

टिप्पण्या