two-groups-clashed-gandhi-rd: ‘तू तिरप्या नजरेने का पाहतो…’ म्हणत गांधी रोडवर वाणिज्य संकुलात दोन गटात तुफान हाणामारी; परिसरात तणाव




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : क्षुल्लक कारणावरून आज दुपारी अकोला शहरातील गांधी रोडवर महापालिका समोरील वाणिज्य संकुल कवच बिजनेस सेंटरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेचा संपूर्णक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका गटातील युवकाने ' तू तिरप्या नजरेने का पाहत आहे ' अशी विचारणा दुसऱ्या गटातील एका युवकास केली असता, ही हाणामारी झाली. यातील एका गटातील युवकांनी दुकानांच्या साहित्याची नासधूस केली. यानंतर संतप्त दुकान मालकांनी यासर्व युवकांना हाकलत त्यांना प्रतिउत्तर दिले. या संपूर्ण घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.





सिटी कोतवाली पोलीस सीसीटिव्हीच्या आधारावर दोन्ही गटातील हाणामारी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत आहेत.


दरम्यान, येथील दुकानदार व अतिक्रमण धारक फेरीविक्रेता यांच्यात नेहमीच वाद होत असतात. मात्र आज झालेली हाणामारीचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

टिप्पण्या