- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
save-wildlife-snake-ghorpad : परीसरात घरांवर फिरत होता नागोबा; घरात दडून बसलेला हा नाग अखेर पकडला गेला, नागरिक झाले भयमुक्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी नाग तसेच घोरपडीला दिले जीवदान.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बाळापुर तालुक्यातील मोरगाव भाकरे गावातील शेतांजवळील अनेक मातींचे घरांवर एक मोठा नाग अनेक दिवसांपासून फिरत दिसायचा त्यामुळे जवळ्पास 20 कुटुंबांना भीती वाटुन ते रात्री जागायचे.
हा विषारी मोठा नाग 13 जुन रोजी रात्री दहा वाजता राजू जंजाळ यांच्या घरात वर भिंतीवर झोपलेला आढळला. जंजाळ यांनी लगेच सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे यांना बोलावून तात्काळ येण्याची विनंती केली.
त्यानुसार बाळ काळणे ताबडतोब मोरगाव भाकरे गावाकडे अकोला शहरातून गेले. तेथे पोहचताच काळणे यांना नाग सुस्त बसलेला दिसला. काळणे यांनी घरा मागील बाजुच्या एका पडक्या भिंतीवर चढुन त्यास खाली ओढले. खाली ओढताच हा नाग फार चपळ झाला. फणा काढून फुसफुस आवाज करीत होता. तरी देखील केवळ मोबाइल टॉर्च प्रकाशावर, अत्यंत अडचणीच्या ठिकाणात संयम पुर्वक काळणे यांनी नागास पकडले. यामुळे जवळपास वीस कुटुंब भयमुक्त झाले.
जास्त पाऊस झाला की साप कोरडी जागा शोधतात. शेतातील, शेताजवळील नदी, नाल्या काठाजवळील कुटुंबानी हया दिवसात सुरक्षितता घ्याव्यात, असे यप्रसंगी जमलेल्या लोकांना बाळ काळणे यांनी मार्गदर्शन केले.
घोरपडी शेतकरी संरक्षक; त्यांचे संरक्षण करा
कृषि उत्पन्न बाजार समिती अकोला येथील चंदू पाटील यांच्या अडत दुकानात 13 जून रोजी घोरपड आढळली. पाटील यांनी घोरपड वाचवण्यासाठी सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे यांना बोलावले. काळने यांनी घोरपडीला पकडून वनविभागामार्फत जंगलात सोडले.
बाळ काळणे यांनी माहिती दिली की, घोरपडीना जिवनदान द्या. त्यांचे संरक्षण करणे म्हणजे शेतकरी बांधवांचे संरक्षण सापांपासुन होते. छोटे साप घोरपड खाते. जमिनीत लपुन बसलेले साप घोरपड सहजतेने पकडू शकते. त्यामुळे घोरपड हे संरक्षक आहेत. मनुष्य हव्यासापोटी हिला अन्न समजून शिकार करतात. मात्र स्वतःचे व निसर्ग साखळीचे फार मोठे नुकसान करतात . कायद्याने घोरपडी पकडण्यास, डांबण्यास व खाण्यास गुन्हा आहे. वनविभाग हया दिवसात सतर्क राहते .
बाळ काळणेंनी वन्यजिव सेवेत शिकाऱ्या जवळुन पकडलेल्या व स्वतः जावुन वाचवलेल्या मोठ्या घोरपडी असंख्य वाचवुन विशेष घोरपड सेवा केली. ही घोरपड वनविभाग सुचनेनुसार बाळ काळणे व चालक आलासिंग राठोड यांनी सुरक्षित जंगलात सोडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा