rain-update-giant-tree-falls: तोष्णीवाल लेआउट मधील महाकाय वृक्ष कोसळले; वृक्षाखाली अनेकांची वाहने दबली




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोल्यात आज सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे अकोला शहरात अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे . तोष्णीवाल लेआउट मधील महाकाय वृक्ष विद्युत खांबावर आदळले. यामध्ये विद्युत खांब वाकला. तसेच शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांच्या सायकल, मोटर सायकल या झाडाखाली दबल्या गेल्या.



मान्सून पूर्व बरसणाऱ्या या पावसाने

आज जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सुद्धा शेतीच नुकसान केलं आहे.

सुमारे पंधरा मिनिट सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती. 



अचानक सुरू झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरातील खुले नाट्यगृह जवळील लावलेलं हॉर्डींग सुद्धा वाकून गेलं. तर तोष्णीवाल लेआउट मधील रस्त्याच्या बाजूला असलेला एक विशाल झाड उन्मळून खाली पडलं आहे. खाली कोसळलेल्या या झाडाखाली सुमारे 10 दुचाकी वाहन आणि सायकली दबली आहेत तर काही दुचाकी गाड्यांचा मोठा नुकसान देखील झाले आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने हे झाड हटविण्याच कार्य सुरू आहेय. तर विजेचे तार तुटल्याने या भागाचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे.




या वादळी पावसात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गोरक्षण रोडवरील पाटबंधारे विभाग कार्यालय समोरील होर्डींग कोसळले. 




अलीमचंदानी यांच्या टिव्ही एस शोरूम समोरील मुरली चहा सेंटर जवळील वृक्ष उन्मळून पडले. आजच्या या पावसाने शहरातील अनेक भागात मोठे नुकसान केले आहे.





टिप्पण्या