भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: वाढती महागाई, बेरोजगारी , शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांसाठी अकोला काँग्रेसच्या वतीने महायुतीवर चिखल फेक आंदोलन करण्यात आलं.
काँग्रेसच्या वतीने आज अकोल्यात महायुतीचे चिन्ह असलेल्या फलकावर चिखल लावून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोला दौऱ्यावर असताना वाडेगाव येथे एका काँग्रेस कार्यकर्त्यानी नाना पटोले यांचे पाय धुतले होते आणि त्यानंतर नवीन वादंग निर्माण झाला होता. महाविकास आघाडी कडून नाना पटोले यांची पाठराखण तर महायुती कडून टीकेची झोड असा सत्र सुरू आहे. महायुतीच्या नेत्यांकडून नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला होता तर आता महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांसाठी अकोला काँग्रेसच्या वतीने महायुतीवर चिखल फेक आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या वतीने महायुतीचे चिन्ह असलेल्या फलकावर चिखल लावून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार 21 जून रोजी महाभ्रष्टचार, बेरोजगारीची समस्या, महिलांवरील अत्याचार अशा अनेक समस्यांनी ग्रासलेले शेतकरी विरोधी भाजपा व महायुतीच्या सरकारच्या विरोधात चिखल फेको आंदोलन करण्यात आले. स्वराज भवन नवीन बस स्टॅन्ड समोर अकोला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.
चिखल फेको आंदोलनाचे प्रमुख मुद्दे
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम महाभ्रष्ट युती सरकारने केले आहे,असा आरोप आंदोलकांनी केला.
सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली आणि आरक्षणाचे वाद निर्माण करून जाती जातीत भांडणे लाऊन राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले,असा आरोप देखील यावेळी काँग्रेसने केला.
सरकारी नोकर भारती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते. NEET परीक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे.तसेच राज्यातील पोलीस भारती चिखलात सुरु आहे. यामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे.सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे यावेळी काँगेसचे पदाधिकारी म्हणाले.
राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडलेजात आहेत. राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहेत पण त्यांना मदत दिली जात नाही. तर दुसरीकडे कांदा. कापूस. सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक होत आहे. राज्यात खाते, बि-बियाणांचा काळाबाजार असून कर्जासाठी शेतकयांची अडवणूक होत आहे. तसेच सरकारच्या आशीर्वादाने श्रीमंतांची मुले गोरगरीब लोकांना गाड्या खाली चिरडत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, महानगर काँग्रेस कमिटीचे निरीक्षक धनंजय देशमुख, प्रकाश तायडे, डॉक्टर जिशान हुसेन, डॉ. सुभाष कोरपे, ॲड. महेश गणगणे, अफरोज खान पठाण, तश्वर पटेल, पुष्पा देशमुख, पद्माकर वासनिक आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा