political-akola-narendra-modi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ; अकोल्यात हजारो कार्यकर्त्यांनी 52 ठिकाणी केला जल्लोष




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे 

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत करण्याच्या दृष्टीने एनडीए सरकारला देशातील 140 कोटी जनतेने जनादेश दिला असून त्या जनादेशाचा सन्मान करून रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनात एनडीएच्या मंत्रिमंडळांनी शपथविधी घेतला. यानिमित्ताने अकोला जिल्ह्यात प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी 52 ठिकाणी जल्लोष साजरा करून मिठाई आतिषबाजी पथक बँड पथक तसेच जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला. 



दिल्ली येथे प्रदेश सरचिटणीस आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आग्रहाचे निमंत्रण असताना सुद्धा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा करता ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अकोला लोकसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवला, त्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा करून कर्तव्य व त्यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने दिल्लीच्या रस्त्याच्या वाटेवर असताना सुद्धा आमदार सावरकर तातडीने सायंकाळी पाच वाजता अकोल्यात दाखल झाले.




स्थानिक भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आतिषबाजी पेढे लाडू तसेच जेसीबीने पुष्पवृष्टी करून जल्लोष साजरा करण्यात आला. सखी मंच  नेत्या सुवासिनीताई धोत्रे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला.


यावेळी अकोला लोकसभा भाजपा संयोजक विजय अग्रवाल, जयंत मसने, किशोर पाटील, माधव मानकर, गिरीश जोशी, अर्चना मसने, कृष्णा शर्मा, संजय गोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड, अजय शर्मा, विजय इंगळे, प्रशांत अवचार, प्रवीण आगवणे, चंदा शर्मा, निशा कडी, सारिका जयस्वाल, चंदा ठाकूर, सुमनताई गावंडे, गीतांजली शेगोकार, संदीप गावंडे, दिलीप मिश्रा, निलेश निनोरे, छाया तोडसाम, सीमा मांदे, सिद्धार्थ शर्मा, अर्चना शर्मा, मंजुषा सावरकर, शिमा पाटील तसेच भारतीय जनता पार्टी जनता युवा मोर्चा विविध आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





अकोला शहरात गांधी चौक, सिव्हिल लाईन चौक, अकोट फाईल, जुने शहर तसेच तालुकास्तरावर मोठ मोठ्या ठिकाणी 55 ठिकाणी जल्लोष साजरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जल्लोष पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर जल्लोष साजरा करण्यात आला.

टिप्पण्या