plastic-banned-government : शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लास्‍टीक वस्‍तुंचा वापर; व्‍यावसायिकावर कारवाई





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शासनाने बंदी घतलेल्‍या प्‍लास्‍टीक वस्‍तू विक्री, वापर व हाताळणी संदर्भात मनपा चारही झोन अंतर्गत तपासणी दरम्‍यान आज उत्‍तर झोन किराणा बाजार येथील मां सती ट्रेडर्स यांच्‍याकडे शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लास्‍टीकचा साठा आढळून आल्‍यावर त्‍यांचेवर रूपये 5 हजाराची दंडात्‍मक कारवाई करून त्‍यांचेकडील असलेला साठा जप्‍त करण्‍यात आला आहे.


          

याचसोबत चारही झोन अंतर्गत करण्‍यात आलेल्‍या तपासणीमध्‍ये किरकोळ व्‍यावसायिकांकडून शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लास्‍टीक पिशव्‍यांचा साठा जप्‍त करून त्‍यांना यापुढे बंदी असलेल्‍या प्‍लास्‍टीकच्‍या पिशव्‍या न वापरणे बाबत ताकीद देण्‍यात आली आहे. सदर कारवाईत मनपातील सर्व स्‍वच्‍छता निरीक्षकांचा समावेश होता.



महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांच्‍या आदेशान्‍वये आणि मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे यांच्‍या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.


अकोला महानगरपलिका क्षेत्रातील नागरिकांनी शासनाने बंदी  घातलेल्‍या  प्‍लास्‍टीक वस्‍तूंची विक्री, वापर, हाताळणी व साठवणूक पुर्णपणे बंद करून अकोला शहर प्‍लास्‍टीक मुक्‍त करण्‍याच्‍या कामामध्‍ये सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे यांनी केले आहे.  




                                                   

टिप्पण्या