- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
maharana-pratap-jayanti-2024: ‘जय महाराणा’ च्या जयघोषाने दुमदुमली अकोला नगरी; महाराणा प्रताप जयंतीनिमत्त शहरात निघाली भव्य शोभायात्रा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : हिंदूसूर्य, मेवाड नरेश महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त रविवारी 9 जून रोजी सायंकाळी 7 वाजता शहरात महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अश्व, आकर्षक चित्ररथ, हजारो राजपूत समाज बांधवांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जय महाराणा असा एकच जयघोष करण्यात आला.
रविवारी हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या 484 व्या जयंतीनिमित्त शहरात सकाळपासून ठीकठिकाणी प्रतिमापूजन सह विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम करण्यात आले होते. रविवारी सकाळी 8 वाजता सिटी कोतवाली चौकातील महाराणा प्रताप बागेत प्रतिमा पूजन करण्यात आले. सोबतच यावेळी सकाळी 10 ते 12 यावेळेत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. राजपूत पुरा भागात प्रतिमापूजन , अनिकट येथे प्रतिमा पूजन, कौलखेड येथे प्रतिमापूजन आणि अल्पोपहार आणि सायंकाळी 7 वाजता सिटी कोतवाली चौकातील महाराणा प्रताप बागेतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे भाजपासह विविध धार्मिक संघटनांनी ठीकठिकाणी स्वागत केले. भाजपाच्या वतीने आमदार रणधीर सावरकर, रामप्रकाश मिश्रा, विजय अग्रवाल व अन्य पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओमप्रकाश सावल, यश सावल, दिलीप देशमुख यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून स्वागत केले.
शोभायात्रेमध्ये महाराणा प्रताप सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सिंह चौहान, पृथ्वीराज सिंह ठाकूर, भोजराज सिंह बैस, प्रदीप गौर, विजयसिंह तवर, रघु ठाकूर, अजय सिंह परमार, बादलसिंह ठाकूर, राजू ठाकूर, ॲड. सुभाष सिंह ठाकूर, विजयसिंह गौर, ब्रिजमोहन सिंह ठाकूर, करण सिंह ठाकूर, राजू ठाकूर केलिवेली, सूरज सिंह चौहान, संतोष ठाकूर, रवींद्र गौर, धर्मेंद्र चंदेल, देवेंद्रसिंह बैस, अजय ठाकूर, प्रवीण गौर, शेखर परमार, चंदन सिंह ठाकूर, सुमेरसिंह चौहान, ॲड. चेतन ठाकूर, चंदनसिंह ठाकूर, श्याम ठाकूर, प्रवीण ठाकूर, कुलदीप ठाकूर, चंदन ठाकूर, रणजित चौहान, कुलदीप चंदेल, विजय चौहान, राजेश चंद्रवंशी, स्वप्नील बैस, अंकित बैस, आश्विन बैस, विजय ठाकूर यांच्यासह महिला मंडळाच्या ललीता चौहान,रितू बैस, चंदा ठाकूर, विद्या बनाफर, मीना बैस, सपना ठाकूर, अनिता बैस, मोना चंद्रवंशी, उमा ठाकूर, सोनिया ठाकूर, प्रीती पवार, माधुरी ठाकूर, अर्चना बैस, लता ठाकूर, नेहा चौहान, माया चौहान, डिंपल ठाकूर, पूनम ठाकूर, माधवी ठाकूर, रिया चौहान, स्वाती ठाकूर, अर्चना गौतम, कल्पना चौहान, संगीता बघेल, पूनम परमार, लीना बैस, कांचन पवार, रेखा ठाकूर, दीपिका ठाकूर, स्वाती पवार, उषा ठाकूर, तेजस्विनी ठाकूर आदी सहभागी झाले होते.
यांनी साकारली महाराणा प्रताप यांची भूमिका
या शोभायात्रेत महाराणा प्रताप यांची भूमिका पवन जोशी नामक युवकाने साकारली. तब्बल साडे सहा फूट उंची आणि 136 किलो वजन असलेल्या पवन जोशी हा संपूर्ण शोभायात्रेचा आकर्षण ठरला होता.
चित्त थरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष
शोभायात्रेत विविध आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. यासोबतच आखाडे, गोपाल कुटिया व्यायाम शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. व्यायामशाळेचे विद्यार्थ्यांनी दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी, भालाफेक, लेझिम आदी क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते.
युवक आघाडीकडून नेतृत्व
या शोभायात्रेचे नेतृत्व युवक आघाडीकडून करण्यात आले. शोभायात्रा मार्गावर विविध सुविधा, महिलांची सुरक्षा, आणि अन्य बाबींची देखरेख युवक आघाडीच्या वतीने ठेवण्यात आली. त्यामध्ये संदीप ठाकूर, दुष्यंत चौहान, राजकमल चौहान, नवज्योत बघेल, सूरज ठाकूर, पप्पू ठाकूर, गौरव चौहान, सौरभ चौहान, आकाश ठाकूर, समीर ठाकूर, किरण ठाकूर, महेंद्र राजपूत, अंकुश ठाकूर, राहुल ठाकूर, धीरज गौतम, पवन ठाकूर यासह युवक सहभागी होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा