भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : जिल्हा परिषदेत महिला राज असून देखील कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून एका महिला ग्रामसेविकेचा छळ झाल्याची गंभीर तक्रार आल्याने जिल्हा परिषद वर्तुळात दोन तिन दिवसापासून एकच खळबळ उडाली आहे. हे गंभीर प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी चांगलेच गांभीर्याने घेतले आहे. दरम्यान जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी संघटना कृति समिती आरोपी अधिकारी कर्मचारी यांच्या पाठीशी उभे आहे. हे प्रकरण आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात पोहचले आहे. यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नाहक गोवण्यात आले असून त्यांची समाजात बदनामी होत आहे. खोटी तक्रार करणाऱ्या महिला ग्रामसेवक व त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी,या मागणीचे निवेदन कृति समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज दिले आहे. याप्रकरणी दोषींवर काय कारवाई होते याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अकोट पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला ग्रामसेविकेच्या विनयभंग प्रकरणी बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात मोठा गदारोळ झाला. यावेळी तक्रारदार महिलेने मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांची भेट घेत आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यावेळी सीईओ बी. वैष्णवी यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेतले असून विशाखा समितीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे तोंडी आदेश दिले आहे.
काय आहे प्रकरण
जिल्ह्यातील अकोट पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या एका महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे कार्यरत असलेले विस्तार अधिकारी लींबाती बारगिरे यांच्याविरुद्ध 15 जुन रोजी रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात तक्रारदार महिलेने जिल्हा परिषदेत पंचायत विभाग व सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. सदर प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक, राज्य महिला आयोग, आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा केली आहे. या तक्रारीत तापी आणि बारगीरे यांच्याकडून नोकरीचा रेकॉर्ड खराब करण्याच्या नावाखाली वेळोवेळी सुरू असलेला छळ, शरीरसुखाची मागणी यासह विविध गंभीर आरोप केले आहे. बुधवारी याच प्रकरणात तक्रारदार महिला ग्रामसेवक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्या साठी गेल्या असता यावेळी तापी आणि त्यांच्यात मोठी खडाजंगी झाली असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगली होती. याबाबत तक्रारदार महीलेला विचारले असता त्यांनी मात्र असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. केवळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली असून त्यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची प्रतिक्रिया तक्रारदार महिला ग्रामसेविकेने दिली.
तापी यांच्याकडून प्रतिसाद नाही
या गंभीर प्रकरणी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांच्याशी त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळू शकला नाही.
आक्षेपार्ह संभाषण
महिला ग्रामसेविकेच्या म्हणण्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी तिला अनेक वेळा व्हॉट्स ॲप वर आक्षेपार्ह असे संदेश पाठवले आहे. अनेकदा आक्षपार्ह असे संभाषण सुद्धा या अधिकारी वर्गाकडून करण्यात आले असल्याची माहिती तिने दिली आहे.
पोलीस निरिक्षकांवर गंभीर आरोप
सदर प्रकरणी तक्रारदार महिलेने रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले आहे. तिने पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत बहूरे यांनी दबाव आणला असल्याचे नमूद आहे. तर एका आरोपीला जाणीवपुर्वक वाचविण्याचा प्रयत्न रामदास पेठ पोलिसांनी केला असल्याचा आरोप सदर महिलेने केला असल्याने रामदास पेठ पोलिस संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. तर याप्रकरणी ठाणेदार मनोज बहुरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असा कुठलाही प्रकार घडला नसल्याची प्रतिक्रिया दिली.
के. आर. तापी, गटविकास अधिकारी व इतर कर्मचारी यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल करुन, बदनामी केल्यामुळे, संबंधितांवर कारवाई करावी - कृति समितीची मागणी
महिला ग्रामसेवक यांनी दिलेल्या निवेदना मध्ये के. आर. तापी गट विकास अधिकारी व इतर कर्मचारी यांचे विरुध्द दर्शविलेली तक्रार ही खोटी व बेबनाव असून प्रत्यक्षात तापी यांचेकडे अकोला पंचायत समितीचा प्रभार असतांना त्यांची पदस्थापना गट विकास अधिकारी बार्शिटाकळी येथे होती व सोबतच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) चा अतिरिक्त प्रभार होता तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार तापी हे कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कार्यालयात बोलाऊन घ्यायचे असे आरोप पुर्णपणे चुकीचे नमुद केले आहे तापी यांच्या कडे बार्शिटाकळी येथील मुळ प्रभार असल्यानुसार ते नियमित 4 ते 5 नंतर बार्शिटाकळी येथील पंचायत समिती मध्ये जाऊन कामकाज करुन घरी जात होते ते कधीच पचायत मधे अकोला येथे कार्यालयीन वेळेनंतर गेलेले नाही. त्यामुळे केलेली तक्रार ही केवळ द्वेषा पोटी व मानसिकता खराब करुन अधिकारी व इतर कर्मचारी यांचे खच्चीकरण करण्यासाठी केलेली असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे.
तक्रारदार महीला ग्रामसेवक हया अकोला पंचायत समिती मध्ये ग्रामपंचायत चिखलगांव येथे कार्यरत
असतांना त्यांनी ग्रामपंचायतचे कामकाजामध्ये अनियमितता केल्यामुळे त्यांचेविरुध्द प्रशासकिय कार्यवाहीचा प्रस्ताव सादर केल्यामुळे सदर चुकीची व बदनामी करणारी तक्रार नोंदविलेली आहे. त्यामुळे समाजामध्ये नाहक बदनामी झालेली आहे, तसेच दिनांक 19 जुन रोजो तापी व प्रकल्प संचालक हे दोघेही कार्यालयीन कामकाजाकरिता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात बसले असतांना तेथे तक्रारदार महीला इतर तिन चार व्यक्ती आले हे पाहुन तापी हे कक्षाचे बाहेर जात असतांना महीला ग्रामसेवक यांचा हात धरुन मारण्याचा प्रयत्न केला. नंतर काही प्रसार माध्यमामध्ये कालीदास तापी यांचे कानशिलात लावल्याबदल चुकीची बातमीच व्हिडीओ टाकुन बदनामी केली आहे. तसेच सदर तक्रारीमध्ये पंचायत समिती, अकोला येथील सतिष सरोदे, विस्तार अधिकारी (पं) व डी. आर. इंगळे, कनिष्ठ सहाय्यक यांची नावे नमूद करुन त्यांचेवर सुध्दा कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. हा प्रकार निदनिय असुन अधिकारी कर्मचारी यांची बदनामी करणारा व मानसिकता खराब करुन मनोबल खच्चीकरण करणारा आहे.
या प्रकारामुळे सर्व अधिकारी यांचे मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन सदर प्रकार इतरही अधिकारी यांचेसोबत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता सदर प्रकरणी तक्रारदार ग्रामसेविका व त्यांचे सोबत असलेल्या इतर संबंधित सर्वावर कायदेशिर कार्यवाही त्वरीत करण्यात येऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी कृति समितीने केली
उपरोक्त प्रकरणी आम्ही निषेध करुन आजपासुन काळया फिती लाऊन कामकाज करित आहे तसेच न्याय न मिळाल्यास नाईलाजास्तव जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आदोलन सुरु करावे लागेल, अशी चेतावणी कृति समितीने दिली आहे.
निवेदनावर जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी संघटना कृती समिती अकोला चे पदाधिकारी अशोक वानखडे गिरीश मोगरे जीडी उघडे एसबी सरोदे एम एच बहुरे डी आर इंगळे आर आर भोबळे दिगंबर मालगे, रवी काटे विनय ठमके अशोक बांगर विलास वडतकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा