- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
bar-owners-arbitrary-excise : उत्पादन शुल्क विभागाच्या मनमानी कारभार विरोधात बार मालकांनी पुकारला बंद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या मनमानी कारभार विरोधात आज अकोला जिल्ह्यातील बार मालकांनी बंद पुकारला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या जाचक अटींमुळे त्रस्त बार मालकांनी आज आपली प्रतिष्ठान बंद करून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारलं आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याने याचा फटका बार मालकांना बसत असल्याचा आरोप यावेळी बार मालकांनी केला.
अंडा विक्रीच्या गाडीवर , धाब्यावर , अनेक ठिकाणी खुलेआम दारू सेवन आणि विक्री केली जाते. मात्र त्यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कोणतीही कारवाई केली जात नाही. लाखो रुपये वार्षिक लायसन्स शुल्क भरल्यानंतरही उत्पादन शुल्क विभाग तर्फे नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी बार मालक असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवनीकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा