akola-crime-2024-murtijapur: वाईन शॉप मालकास मारहाण करुन रोख रक्कम लंपास करणारे पाच आरोपी जेरबंद







भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मूर्तिजापुर येथील वाईन शॉप मालकास अडवुन काठीने मारून त्यांचे जवळील 1,45000 रूपयाची बॅग लंपास करणारी टोळी जेरबंद करण्यात मूर्तिजापूर शहर पोलिसांना यश मिळाले आहे.



पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर (जि. अकोला) येथील रहिवासी राजेश मुलचंद गुप्ता (वय 44 वर्ष रा. शिवाजीनगर मुर्तीजापुर) हे 08 मे 2024 रोजी आपल्या गुप्ता वाईन शॉपी मधील दिवसभरातील व्यवहाराचे 1,45,000 रूपये बॅग मध्ये घेवुन मोटार सायकलने त्यांचे घरी जात होते. दरम्यान दोन मोटार सायकलवर आलेल्या 4 ते 5 अज्ञात इसमांनी त्यांना अडवुन मोटार सायकलला लाथ मारून गुप्ता यांना मोटार सायकलसह खाली पाडले. त्यांना लाकडी काठीने मारून त्यांचे जवळ असलेली 1,45000 रूपये रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेले. 


यानंतर गुप्ता यांनी पोलीस स्टेशन गाठून अज्ञात आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन मुर्तीजापुर शहर येथे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरूद्ध भारतीय दंड विधान कलम 394,34 अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.



गुन्हयाचे तपासात मिळालेल्या माहीतीवरून विशाल बाबुलाल राउत (वय 19 वर्ष रा.थीलोरी ता.दर्यापुर जि. अमरावती), यश नंदकीशोर ननीर (वय 20 वर्ष रा. गौतमनगर मुर्तीजापुर), महेश सुधाकर गवई (वय 22 वर्ष रा. जुने घरकुल मुर्तीजापुर ) सौरभ शशिकांत बाळापुरे (वय 21वर्ष रा. काळा गोटा मुर्तीजापुर), अमरदीप राजेंद्र मोहोड (वय 22 वर्ष रा. पहाडीपुरा, मुर्तीजापुर) यांना गुन्हयाच्या संबंधाने पोलिसांनी सविस्तर विचारपुस केली असता, पाचही आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली. 


आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हीरो स्प्लेंडर कंपनीची एम एच 27 डी पी 8262 किंमत अंदाजे 1,20,000 रूपये, एक पॅशन प्रो मोटार सायकलक एमएच 30 ए एच 6395 की 36000 रूपये , एक जुना वापरता मोबाइल रेड नोट 10 प्रो कंपीनीचा किंमत अंदाजे 21000 रूपये तसेच नगदी 20000 रूपये असा एकुण 1,97,000 रूपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींची गुन्हयाबाबत कसून चौकशी सुरू आहे.



पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे,  उपविभागीय पोलीस अधिकारी  मनोहर दाभाडे याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक भाऊराव घुगे, ए पी आय अनंत वडतकर, पोलीस उपनिरिक्षक गणेश सुर्यवंशी, पोलीस उपनिरिक्षक शामसुंदर तायडे तसेच सहकारी सुरेश पांडे, नंदकीशोर टिकार, सचिन दांदळे, मंगेश विल्हेकर, सचिन दुबे, गजानन खेडकर, स्वप्नील खडे, भूषण नेमाडे, नामदेव आडे यांनी हा गुन्हा उघड करण्यात यश मिळविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय अनंत वडतकर करीत आहे.


टिप्पण्या