akola-city-crime-murder-case: इराणी झोपडपट्टी जवळ एकाची हत्या; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 17 जुन पर्यन्त पोलीस कोठडी






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येत मध्यवर्ती बस स्थानक समोर असलेल्या इराणी झोपडपट्टी बाजोरिया मैदान जवळ बुधवारी रात्री एका इसमाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मो. अन्सार शेख मो.सलीम शेख (वय अंदाजे 45) असे मृतकाचे नाव आहे.


 

मृतक हा न्यू बैदपुरा अकोला येथील रहिवासी असल्याचे कळते. स्थानिक नागरिकांना एक व्यक्ती जखमी अवस्थेत दिसला. नागरिकांनीच त्याला ऑटोरिक्षात टाकून सर्वोपचार रुग्णालयात तातडीने भरती केले.मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. 




दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. दरम्यान घटनास्थळी मृतकाची मोटार सायकल तसेच आरोपीची चप्पल आणि रुमाल पडला असल्याचे घटना स्थळाची पाहणी करताना पोलीसांना दिसले.



मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302,34 अन्वये गुन्हा नोंदवून प्रकरण तपासात घेतले. पोलीसांनी महत्वाचे पुरावे घटनास्थळावरून मिळविले. दरम्यान आज गुरुवारी पोलीसांना दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हत्येमागील कारण अद्याप समोर आले नसून, जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


फरार आरोपींना अटक; 17 पर्यंत पोलीस कोठडी 



पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला अप कं 197/2024 कलम 302, 34 भादंवी गुन्हयातील फरार झालेले दोन्ही आरोपीतांना अटक


12 जुन 2024 रोजी रात्री 8 वाजता दरम्यान आरोपी अविनाश अनिल इंगळे, (वय 19 वर्षे रा. ईराणी झोपडपट्टी, अकोला) व त्याचा साथीदार कुलदीप उर्फ शिवा सुरेश झीमुंर्डे,( वय 24 वर्षे रां. मराठानगर, अकोला) यांनी संगनमत करून मृतक  मोहम्मद अन्सार मोहम्मद सलीम, (वय 50 वर्षे रा. लक्कडगंज, न्यु बैदपुरा, अकोला) याचा संगनमत करून जुन्या वादावरून ईराणी झोपडपट्टी, अकोला येथे खुन करून पळुन गेले. यावरून पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथे अप कं 197/2024 कलम 302, 34 भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथील गुन्हे शोध पथक (डि.बी) चे पोलीस अंमलदार यांनी फरार आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन आरोपीतांना आठ तासांच्या आत अटक करून न्यायालय समक्ष हजर केले असता  न्यायालयाने आरोपीतांचा 17 जून पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे व सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.


सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला सतीष कुळकर्णी , स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोलीस निरीक्षक शंकर शेळके  यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथील पोलीस निरीक्षक सुनिल वायदंडे , पोलीस उपनिरीक्षक बुध्दू रेगीवाले व गुन्हे शोध पथक (डि.बी.) चे पोलीस अंमलदार  महेंद्र बहादुरकर,  अश्वीन सिरसाट, अमीत दुबे,  ख्वाजा शेख,  आतीष बावस्कर,  निलेश बुंदे, किशोर येउल,  अमोल दाळु यांनी प्रत्यक्ष कार्यवाही पार पाडली आहे.





टिप्पण्या