- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफ गल्लीत आज शनिवारी भरदिवसा दोन अज्ञात युवकांनी महिलांची छेड काढीत चाकूने हल्ला चढविला. या घटनेमुळे शहरातील मुख्य बाजार पेठेत दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या हल्ल्याची संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, या गल्लीतून दोन महिला जात असताना दोन युवकांनी त्यांची छेड काढली. याला एका महिलेने विरोध केला असता युवकाने तिला मारहाण करण्यास सर्वात केली. हे पाहून दुसरी महिला तिच्या मदतीला धावली. या झटापटीत युवकाच्या हातातील चाकूचा वार या महिलेस बसला. जखमी महीला जमीनीवर कोसळली.तर तिच्या सोबतीचा महिलेने त्या युवकांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
सराफ गल्लीत सोन्याच्या दागिन्यांची दुकाने असल्याने गल्लीत महिलांची वर्दळ जास्त असते. याचा फायदा घेत अज्ञात आरोपी महिलांचा विनयभंग करून त्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याच्या घटना घडवून आणतात. एकीकडे चाकू हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे, तर दुसरीकडे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सुवर्ण व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दुकानदार व महिलांच्या सुरक्षेबाबत या संकुलात ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यात मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
New update
हल्ल्यात जखमी झालेली महीला ही सोनझारी समाजाची असल्याचे कळते. माय व लेक रस्त्याने जात असताना मुलीला युवकांनी चिडविले. त्यामूळे आईने विरोध केला. त्यानंतर आईवर झालेला हल्ला बघून मुलगी अडवायला गेली.मात्र यात मुलगी गंभीर झाली. यावेळी युवकाच्या हातात चाकू नसून पिंचीस सारखा धारधार वस्तू असल्याचे कळते. मुलीला उपचारार्थ रुग्णालयात भरती केले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान अलीकडे सराफा बाजारात अश्या घटना वाढत असून, पोलीसांनी सुवर्ण व्यवसायिकांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा