road-accident-river bridge-akl: चान्नी फाटा जवळ नदी पुलावर ट्रक व कारची जोरदार धडक; एक गंभीर जखमी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वाडेगाव येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चान्नी फाटा जवळील निर्गुणा नदीवरील पुलावर ट्रक व चार चाकी वाहनाचा आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे. 



प्राप्त माहितीनुसार एम. एच. 46 बी क्यू 0583 कार आणि वाडेगाव कडून पातुर कडे जात असलेल्या जी.जे. 36 व्हि 54 80 क्रमांक असलेला ट्रक पुलावर समोरासमोर येवून धडकले. ही धडक एवढी जोरदार लागली की, ट्रक हा जागेवरच पलटी झाला तर कार पुलावर जावून अक्षरशः लटकली. यात कार चालक शेख अमीर शेख जाकीर (वय वर्ष 24 ) हा  गंभीर जखमी झाला. तर रशीद शहा जाफर शहा (रा. रिसोड) हे किरकोळ जखमी झालेत. भारतीय अलंकार न्यूज जखमींना नागरिकांनी तात्काळ वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात हलविले. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल खान यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता जखमींना अकोला येथे पाठविले. 



या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर दोन्हीं बाजूने वाहनाच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळतात वाडेगाव पोलीस चौकीतील कर्मचारी घटनास्थळी पोहचून पुढील सोपस्कार पार पाडले.  



टिप्पण्या