road-accident-near-turkhed: तुरखेड नजीक कार व ऑटोरिक्षाचा भीषण अपघात; दोन ठार, तीन गंभीर जखमी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील मुर्तीजापुर ते कारंजा राज्य महामार्गावरील तुरखेड नजीक कार व ऑटोरिक्षाचा भीषण अपघात झाला असून, या भीषण अपघातात एका चार वर्षीय चिमुकलीसह एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर  तीन  गंभीर जखमी झाले आहेत.




अमारोसमोर येवून दोन्हीं वाहन धडकल्याने झालेल्या या अपघातात ऑटोरिक्षाचा चुराडा झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना प्रथम उपचारार्थ संत गजानन महाराज आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर, अमोल खंदारे, बादशहा यांनी तातडीने मुर्तीजापुर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले. तर जखमिंची प्रकृती चिंताजनक असल्याने  पुढील उपचारार्थ अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्याचे कळते.



टिप्पण्या